Marathi News> भारत
Advertisement

ताजमहलमध्ये नमाजासाठी ठराविक मुस्लिमांनाच संधी

ताजमहल परिसरात कोणत्या बाहेरच्या व्यक्तीला नमाजाची परवानगी मिळणार नाही.

ताजमहलमध्ये नमाजासाठी ठराविक मुस्लिमांनाच संधी

आगरा : ताजमहल परिसरात नमाज पढणाऱ्यांना शुक्रवारपासून आपले ओळखपत्र न्यावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने बुधवारी यासंबधी निर्देश दिले आहेत.

ताजमहल परिसरात कोणत्या बाहेरच्या व्यक्तीला नमाजाची परवानगी मिळणार नाही. दरम्यान स्थानिक लोकांनाच ताजमहल परिसरात जाण्याची परवानगी असेल.

ओळखपत्र बाळगा 

जर तुम्ही आगरामध्ये राहणारे असाल तर तुम्हाला तुमचे ओळखपत्र दाखवून नमाज पढू शकता. पर्यटकांसाठी ताजमहल बंद असताना देखील बाहेरचे लोक (बांगलादेशी आणि गैर भारतीय) इथे प्रवेश करतात. 
ताजमहलवरील शुक्रवारपासून तीनही गेटवर सुरक्षा रक्षक तैनात राहणार आहेत. 

कडेकोट तपास 

ताजमहलच्या बाहेर प्रशासन अधिकारी आणि पोलीस तपासानंतर स्थानिक व्यक्तींना नमाजसाठी प्रवेश मिळणार आहे. 

Read More