Ahmedabad London Air India Plane Crash : अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेबाबात 20 दिवसानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. Air India Plane Crash का झाले याचा खुलासा झाला आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालात, सूत्रांचा हवाला देत, एअर इंडियाच्या वैमानिकांनी फ्लाइट सिम्युलेटरमध्ये विमानाच्या पॅरामीटर्सची पुन्हा चाचणी केली. तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे संभाव्य कारण या रिपोर्टमध्ये समोर आले.
12 जून 2025 रोजी भारतात एक मोठी विमान दुर्घटना घडली. अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं बोईंग विमान उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात कोसळलं.या विमानातून 242 जण प्रवासी करत होते. त्यातील 241 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनमुळे जगभरात खळबळ माजली. एअर इंडियाच्या वैमानिकांनी विमान अपघाताच्या वेळी उद्भवलेल्या सिम्युलेशनद्वारे विमानाची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. वैमानिकांनी लँडिंग गियर तैनात करण्यासोबतच विमानाचे पंख मागे घेतले. असे आढळून आले की पंखांचे फ्लॅप ओपन न झाल्यामुळे हा अपघात झाला आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालात सूत्रांचा हवाला देत या अपघाताचे संभाव्य कारण वर्तवण्यात आले आहे. फ्लाइट सिम्युलेटरमध्ये एअर इंडियाच्या वैमानिकांनी विमान अपघातादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडांचे निरीक्षण केले आणि संभाव्य कारणे शोधली. तथापि, एअर इंडियाने या तपासाबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे. अहवालानुसार, बोईंग 787 फ्लाइट एआय 181 च्या अवशेषांचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंवरुन फ्लॅप उघडे होते, दुमडलेले नव्हते असे स्पष्ट दिसत आहे. आधी सांगितले जात होते. फ्लॅप्स विमानाला टेकऑफ दरम्यान वर येण्यास किंवा लँडिंग दरम्यान वेग कमी करण्यास मदत करतात.
अहवालाद्वारे, अनेक तज्ञांनी तांत्रिक त्रुटींमुळे विमान कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. विमान वाहतूक तज्ञ आणि माजी नौदलाचे पायलट कॅप्टन स्टीव्ह शिबनर म्हणाले की दोन्ही इंजिन एकाच वेळी बिघाड झाल्यामुळे अपघात होऊ शकतो. उड्डाणानंतर लगेचचरॅम एअर टर्बाइनयाचा वापर केल्याने टेकऑफनंतर लगेचच दोन्ही इंजिन निकामी होण्याची शक्यता दिसून येते असे सांगितले. ही सिम्युलेशन प्रक्रिया विमान अपघाताच्या अधिकृत तपासापेक्षा वेगळी आहे. विमान अपघात तपास ब्युरो(एएआयबी)विमान अपघाताचे कारण तपासले जात आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की विमान अपघाताची संभाव्य परिस्थिती शोधण्यासाठी हे सिम्युलेशन करण्यात आले.
अपघाताच्या फुटेजच्या आधारे, एअर इंडियाच्या वैमानिकांना असे आढळून आले की विमानाचा लँडिंग गियर थोडा पुढे झुकला होता, ज्यावरून असे दिसून येते की टेकऑफनंतर चाके आत येऊ लागली होती. परंतु त्याच वेळी, लँडिंग गियरचे दरवाजे उघडले नाहीत, जे सूचित करते की विमानात अचानक वीज गेली (वीज बिघाड) किंवा हायड्रॉलिक बिघाड झाला असावा.
विमानाचा ब्लॅक बॉक्स आधीच काढून टाकण्यात आला आहे. त्याचा डेटा देखील डाउनलोड करण्यात आला आहे. असे मानले जाते की पुढील काही दिवसांत विमान अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय घडले हे स्पष्टपणे कळेल. एएआयबी मार्फत दिल्ली प्रयोगशाळेत याची चौकशी सुरू आहे.