Ahmedabad London Air India Plane Crash: एअर इंडियाचे बोईंग 787-8 हे विमान कोसळण्याच्या काही सेकंद आधी झालेले दोन पायलटमधील संभाषण फ्लाइट ऑडिओ रेकॉर्डरमधून जप्त करण्यात आले आहे. यात एका पायलट दुसऱ्याला पायलटला विचारत आहे की 'तुम्ही इंधन का बंद केले?' त्यावर दुसऱ्याने 'मी बंद नाही केले असे उत्तर दिले. 12 जून रोजी हा खुलासा अपघाताच्या अगदी एक महिन्यानंतर भारताच्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने शेअर केलेल्या अंतरिम अहवालाचा भाग होता. कॉकपिटमध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग असेल तर कॅमेरे का नाहीत? अर इंडिया विमान अपघातानंतर उपस्थित झालेल्या प्रश्नामुळे खळबळ उडाली आहे.
12 जून 2025 रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये भयानक दुर्घटना घडली. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं बोईंग विमानाने टेक ऑफ केले. उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात कोसळलं.या विमानातून 242 जण प्रवासी करत होते. त्यातील 241 जणांचा मृत्यू झाला. या विमानाच्या चौकशी अहवालामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कॉकपिट व्हिडिओ रेकॉर्डरची मागणीही वाढली आहे. व्हिडिओ फुटेज अशा परिस्थितीत अचूक उत्तरे देऊ शकते, तर आपण फक्त ऑडिओवर अवलंबून का राहावे? विमानांमध्ये इतके उच्च तंत्रज्ञानाचे इलेक्ट्रॉनिक्स आहेत त्यांच्या कॉकपिटमध्ये कॅमेरे का असू शकत नाहीत. जे गंभीर परिस्थितीत घेतलेले निर्णय आणि कृती रेकॉर्ड करू शकतात. नवीन विमानांमध्ये कॅमेरे बसवणे शक्य आहे
विमाने सरासरी एक दशक जुनी असल्याने कॉकपिट्समध्ये कॅमेरे बसवणे थोडे आव्हानात्मक असू शकते, परंतु नवीन विमानांमध्ये कॅमेरे बसवणे हे कठीण काम नसावे. हवाई अपघातांची चौकशी करणारी स्वतंत्र अमेरिकन सरकारी संस्था, राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) ला जवळजवळ 25 वर्षांपूर्वी कॉकपिट व्हिडिओ रेकॉर्डरची आवश्यकता होती.
जर कार आणि ट्रकमध्ये कॅमेरे बसवता येतात, तर विमानांमध्ये का नाही? अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर भारतातील आणि परदेशातील लोक हा प्रश्न विचारत आहेत. या भीषण विमान अपघातात 260 लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात अनेक परदेशी नागरिकांचा समावेश होता.
कॉकपिट व्हिडिओ रेकॉर्डरमध्ये सर्वात मोठा अडथळा म्हणजे स्वतः वैमानिक. त्यांचा असा युक्तिवाद आहे की कॉकपिट फुटेजमुळे गोपनीयतेचे उल्लंघन होईल कारण वैमानिक अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत भीतीशिवाय काम करतात. त्यामुळे ज्युनियर वैमानिक वरिष्ठ वैमानिकांच्या टिप्पण्या आणि निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात अशा संस्कृतीवरही परिणाम होईल. वैमानिकांना अशी भीती देखील आहे की एअरलाइन्स त्यांचे निरीक्षण करण्यासाठी कॅमेरे वापरू शकतात.
विमान अपघातांचे व्हिडिओ लीक होऊ शकतात, अशीही भिती व्यक्त केली जात आहे. काही प्रकरणांमध्ये फ्लाइट रेकॉर्डरमधील ऑडिओ लीक झाला आहे आणि यामुळे पीडितांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसू शकतो. कॉकपिटमध्ये कॅमेर बसवण्याच्या निर्णयाचा संघटनांकडून विरोध केला जात आहे. विशेषतः अमेरिकेत, जिथे विमान उद्योगाचा आकार आणि वैमानिकांची संख्या पाहता ते प्रभावी आहेत. वैमानिकांकडून कॉकपिट व्हिडिओ रेकॉर्डरवर आणखी एक आक्षेप आहे तो म्हणजे त्यांना अशा प्रकारे वागण्यास भाग पाडले जाते.