Marathi News> भारत
Advertisement

अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेत धक्कादायक ट्विस्ट! फ्यूल कंट्रोल स्विच अचानक 'कट-ऑफ' कसा झाला? AAIB अहवालानंतर पायलटचा प्रश्न

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. फ्यूल कंट्रोल स्विच अचानक  'कट-ऑफ' कसा झाला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.   

 अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेत धक्कादायक ट्विस्ट! फ्यूल कंट्रोल स्विच अचानक  'कट-ऑफ' कसा झाला? AAIB अहवालानंतर पायलटचा प्रश्न

Ahmedabad Plane Crash, AAIB Report: अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेत धक्कादायक ट्विस्ट आला आहे.  12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल आला आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या या प्राथमिक अहवालात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. टेक ऑफ झाल्यानंतर काही सेकंदातच एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाइनरचा इंधन-नियंत्रण स्विच अचानक 'कट-ऑफ' स्थितीत गेला. त्यामुळे इंजिनांना इंधन मिळणे बंद झाले आणि इंजिनांनी काम करणे बंद केले. आता वैमानिकांनी AAIB च्या या अहवालावर चिंता व्यक्त केली आहे. 

'इंजिनने प्रत्यक्षात कधी जोर देणे बंद केले हे स्पष्ट नाही.' AI 171 अहवालात असे म्हटले आहे की 08:08:42 UTC नंतर, इंधन नियंत्रण स्विच 'कट ऑफ' स्थितीत ठेवण्यात आला होता, म्हणजेच इंजिन बंद करण्यात आले होते. परंतु अहवालाच्या दुसऱ्या भागात असेही म्हटले आहे की टेकऑफनंतर लगेचच, विमानाची RAT (रॅम एअर टर्बाइन) प्रणाली सक्रिय करण्यात आली होती, जी इंजिन पूर्णपणे काम करणे थांबवल्यावरच सुरू होते असे विमान वाहतूक सुरक्षा तज्ज्ञ कॅप्टन अमित सिंग म्हणाले.

कॅप्टन अमित सिंग यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, 'एवढ्या प्राथमिक अहवालात आतापर्यंतचा डेटा सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर करायला हवा होता. पण या अहवालामुळे उलट शंका आणि प्रश्न निर्माण झाले आहेत की, AAIB चा हेतू स्पष्ट आहे का?' एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया (ALPA-I) चे अध्यक्ष कॅप्टन सॅम थॉमस म्हणाले, 'इंधन नियंत्रण स्विच कोणी कापला हे विचारणाऱ्या वैमानिकांमधील संभाषण चिंताजनक आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे अपघातानंतर आपत्कालीन लोकेटर ट्रान्समीटर का काम करत नव्हता? AAIB अहवालावर अधिकृत स्वाक्षरी नाही, तपास अजूनही गुप्त आहे. ज्यामुळे विश्वासार्हता आणि जनतेचा विश्वास कमी होत आहे.

पात्र, अनुभवी लाइन वैमानिकांना अजूनही तपास पथकात समाविष्ट केले जात नाही.  'पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी किमान पर्यवेक्षक म्हणून तपासात समाविष्ट करण्याची विनंती ALPA-I ने पुन्हा केली.' तर, बोईंग 737 चे माजी कमांडर आणि प्रशिक्षक कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी दावा केला की, 'पायलटने जाणूनबुजून इंधन बंद केले. उजव्या इंजिनच्या काही सेकंदांनंतर डावे इंजिन बंद झाले, जे दर्शवते की इंधन नियंत्रण स्विच एकामागून एक बंद केले जात होते. AAIB च्या अहवालात बरीच अस्पष्टता आहे.

12 जून 2025 रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये भयानक दुर्घटना घडली. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं बोईंग विमानाने टेक ऑफ केले.  उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात कोसळलं.या विमानातून 242 जण प्रवासी करत होते. त्यातील 241 जणांचा मृत्यू झाला. 

Read More