Marathi News> भारत
Advertisement

मोठा स्फोट झाला अन् परिसरात धुराचे लोट, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला एअर इंडिया विमान दुर्घटनेचा थरार

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान क्रॅश झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे आसपासच्या इमारतींचे मोठे नुकसान झालं आहे.  

मोठा स्फोट झाला अन् परिसरात धुराचे लोट, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला एअर इंडिया विमान दुर्घटनेचा थरार

Ahmedabad plane crash : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-171 हे उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. प्राथमिक माहितीनुसार या विमानाने दुपारी 1:38 वाजता उड्डाण केले. यानंतर सुमारे पाच मिनिटांनी हे विमान मेघानीनगर परिसरातील एका निवासी भागात कोसळले. या विमानात विमानात 230 प्रवासी होते. तसेच 12 क्रू मेंबर्स देखील होते. एकूण या विमानात 242 प्रवासी होते. हा अपघात घडला त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले. पाहूयात सविस्तर 

या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताचा थरार सांगितला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, विमान अचानक क्रॅश झाल्यानंतर त्याठिकाणी मोठा स्फोट झाला.  स्फोटानंतर तेथील संपूर्ण परिसर धुराने भरला होता. विमानाचे ढिगारे विखुरले होते आणि जवळपासच्या अनेक इमारतींचेही नुकसान झाले असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींमधील एका व्यक्तीने सांगितले की त्याचे कार्यालय अपघातस्थळापासून फक्त 200 मीटर अंतरावर आहे. तो बाहेर येताच मोठा आवाज झाला आणि आकाशात काळ्या धुराचे लोट दिसू लागले. 

या अपघातात विमानाचे पंख आणि इतर भाग हा वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. दुर्घटनेनंतर जवळच्या इमारतींमधील लोक हे त्या ठिकाणी पोहोचले. असे म्हटले जात आहे की विमान ज्या ठिकाणी क्रॅश झाले त्या ठिकाणी डॉक्टरांचे क्वार्टर आहेत. मात्र, या घटनेनंतर विमानातील लोकांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. 

अहमदाबाद दुर्घटनेवर मुरलीधर मोहोळ काय म्हणाले? 

अहमदाबात विमान दुर्घटनेनंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, विमान दुर्घटनेतील जखमींना वाचवणे आणि त्यांना उपचार देणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. डीजीसीए आणि इतर वरिष्ठ अधिकारी तपासासाठी घटनास्थळी उपस्थित आहेत. हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. 

अहमदाबाद दु्र्घटनेनंतर सिविल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या रमीला नावाच्या महिलेने सांगितले की त्यांचा मुलगा हा जेवण करण्यासाठी होस्टेलमध्ये गेला होता. जिथे ते विमान कोसळलं. तिचा मुलगा सुरक्षित आहे. त्याच्यासोबत माझे बोलणे झालं आहे. त्याने या घटनेनंतर दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्याने त्याचा जीव वाचवला. ज्यामध्ये त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. 

Read More