Marathi News> भारत
Advertisement

Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेबाबतची 'या' ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली!

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळून 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. अशातच गौरव पुरोहित यांनी केलेली भविष्यवाणी व्हायरल होत आहे. 

Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेबाबतची 'या' ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली!

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका ज्योतिषाने 7 जूननंतर मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी केली होती. ज्यामध्ये त्याने पोस्ट केलेल्या भविष्यवाणीमध्ये या अपघातात एका मोठ्या नेत्याच्या मृत्यू होण्याची देखील भविष्यवाणी केली होती. 

दरम्यान, सोशल मीडियावर ज्योतिषी गौरव पुरोहितने 31 मे 2025 रोजी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांने म्हटले होते की, 7 जूननंतर भारतासह अनेक देशांमध्ये एक मोठा विमान अपघात होईल. यामध्ये या घटना अनेक देशांमध्ये घडतील. ज्यामध्ये भारत, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनमधील मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तींचा विमान अपघातात मृत्यू होऊ शकतो. साधारणपणे, त्याचा पूर्ण योग सध्या तयार होत आहे. यासोबतच गौरव पुरोहितने एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या मृत्यूची देखील भविष्यवाणी केली होती. 

गौरव पुरोहित गेल्या पाच वर्षांपासून करतोय भविष्यवाणी

याआधी देखील गौरव पुरोहितने भविष्यवाणी केली होती. ज्यामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय राजकारण, क्रीडा, लष्कर, अर्थव्यवस्था अशा मुद्द्यांवर भविष्यवाणी केली होती. यामधील त्याचे अनेक दावे खरे देखील ठरले आहेत. त्यासोबत त्याने राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आयपीएलबाबत केलेली भविष्यवाणी अचूक ठरली आहे.  

एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत  241 प्रवाशांचा मृत्यू 

अहमदाबाद एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत  241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुदैवाने 1 प्रवासी बचावला आहे. अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटनेनं देश शोकसागरात बुडाला असून 241 प्रवाशांच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे. एअर इंडिया ही कंपनी टाटा ग्रुपने घेतल्याने या विमान दुर्घटनेनंतर टाटा ग्रुपकडूनही दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे.

त्यासोबतच अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेऊन टाटा ग्रुपने अहमदाबादमधील विमान दुर्घटनेतील जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींचा वैद्यकीय खर्च देखील टाटा ग्रुपकडूनच करण्यात येणार असून आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत जखमींना मिळेल, असे टाटा ग्रुपने म्हटले आहे. 

Read More