Marathi News> भारत
Advertisement

अहमदाबाद विमान दुर्घटनेतून आश्चर्यकारकरित्या वाचली तरुणी, 'ती' 10 मिनिटं जीव वाचवणारी ठरली

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये वास्तव्यास असणारी भूमी चौहान लंडनला जाणाऱ्या प्रवाशांपैकी होती. मात्र काही मिनिटं उशीर झाल्याने तिचं विमान सुटलं होतं.   

अहमदाबाद विमान दुर्घटनेतून आश्चर्यकारकरित्या वाचली तरुणी, 'ती' 10 मिनिटं जीव वाचवणारी ठरली

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत 240 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाचं विमान B727 अहमदाबाद येथून गॅटिवक (AI-171) ला निघालं होतं. टेकऑफ करताच विमान दुर्घटनाग्रस्त झालं. विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यामध्ये 2 पायलट आणि 10 क्रू मेम्बर्स होते. पण आश्चर्यकारकपणे विमानातील दोन प्रवासी वाचले आहेत. यामधील एक प्रवासी रमेश विश्वासकुमार विमानात प्रवास करत होता. तर भूमी चौहान या तरुणीची फ्लाईट चुकल्याने ती वाचली आहे. 

भूमी चौहान या तरुणीला अहमदाबादमधील वाहतूक कोंडीने वाचवलं आहे. वाहतूक कोंडीत अडकल्याने भूमी 10 मिनिटं उशिराने सरदार वल्लभभाई विमानतळावर पोहोचली होती. यामुळे तिला विमानात बोर्डिंग करण्याची परवानगी देण्यात आली नाही. मीडियाशी संवाद साधताना भूमीने आपलं विमान 1.10 वाजता टेकऑफ करणार होतं असं सांगितलं आहे. 

बाहेर पडल्यानंतर मिळालेली दुर्घटनेची माहिती

भूमीने सांगितलं की, मी बाहेर आल्यानंतर मला दुर्घटनेची माहिती मिळाली. यानंतर माझे पाय थरथरायला लागले होते. फार वेळ तिला मानसिक धक्का बसला होता. तिने सांगितलं की, विमान सुटल्याने आपण नाराज होऊन एक्झिट गेटवर पोहोचलो तेव्हा ते विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचं समजलं. 

माध्यमांशी बोलताना भूमीने सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच तिचे मन सुन्न झाले. त्यानंतर ती घरी परतली. भूमी लंडनला जाणार होती. ती तिच्या पतीसोबत लंडनमध्ये राहते आणि सुट्टीसाठी भारतात आली होती. तिचा पती अजूनही ब्रिटनमध्ये आहे. फक्त 10 मिनिटांच्या उशिरामुळे ती प्रवास करू शकली नाही. ट्रॅफिकमुळे तिला विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला. विमान अपघाताची बातमी ऐकताच ती स्तब्ध झाली. माझ्या गणपती बाप्पाने मला वाचवले अशी भावना तिने व्यक्त केली आहे. विमान चुकल्यानंतर ती दुपारी 1.30 ३० वाजता विमानतळावरून परतली. भूमी दोन वर्षांपूर्वी लंडनला गेली होती. त्यानंतर ती पहिल्यांदाच भारतात आली होती.

विमानाच्या आतील प्रवासी वाचल्याने आश्चर्य

विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर आगीच्या ज्वाळा उठल्या होत्या. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीदेखील जीव गमावला आहे. पण इतकी मोठी दुर्घटना असतानाही विमानाच्या आतील एक प्रवासी वाचला. रमेश विश्वास कुमार असं या वाचलेल्या प्रवाशाचे नाव असून तो 40 वर्षांचा आहे.  अहमदाबादमधील असरवा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश सीट क्रमांक 11A वर बसलेला होता.  

Read More