Marathi News> भारत
Advertisement

मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर? अमेरिकेच्या अहवालात मोठा दावा

Air India Crash Investigation : जगातील सर्वात मोठ्या विमान अपघातांपैकी एक अहमदाबाद एअर इंडिया विमान आहे. या अपघात कसा झाला यासंदर्भात अमेरिकन मीडिया रिपोर्टमध्ये एक मोठा दावा करण्यात आला आहे.     

मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर? अमेरिकेच्या अहवालात मोठा दावा

Air India Plane Crash : 12 जून 2025 हा दिवस भारतीयांसाठी काळा दिवस ठरला. यादिवशी एअर इंडियाच्या विमानाला अहमदाबादमध्ये भीषण अपघात झाला. अहमदाबाद विमानतळावर टेकऑफ केल्यानंतर पुढच्याच क्षणात ते विमान कोसळलं. तर 241 प्रवाशांच्या मृत्यूला जबाबदार कोण? याबद्दल विमान अपघाताचा प्राथमिक अहवालातून धक्कादायक खुलासा होणार आहे. या अपघाताला 1 महिना उलटला हे. त्यापूर्वी अमेरिकन मीडिया रिपोर्टमध्ये एक मोठा संशय उपस्थितीत केला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विमानाच्या इंजिनमधील इंधन पुरवठा नियंत्रित करणारे स्विच बंद करण्यात आले होते. यामुळे, टेकऑफ झाल्यानंतर लगेचच इंजिनमधील थ्रस्ट संपला आणि विमान कोसळलं. थ्रस्ट म्हणजे विमानाला उंच ठेवणारी शक्ती असते.  

खरं तर, आतापर्यंतच्या तपासात बोईंग ड्रीमलायनर विमानात कोणताही तांत्रिक बिघाड आढळलेला नसल्याने नेमका हा अपघात झाला तरी कसा याला कोण जबाबदार आहे, याबद्दल शोध लावला जात आहे. तर अमेरिका मीडिया रिपोर्टमध्ये ज्या स्विचबद्दल बोलं जातंय, ते पायलट आपत्कालीन परिस्थितीत इंजिन सुरु किंवा बंद करण्यासाठी करतो. अमेरिकन अहवालात करण्यात आलेला दावा अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा भारतातील विमान अपघात तपास ब्युरोचा तपास अहवाल सार्वजनिक करण्यात येणार आहे. नियमानुसार, अहवाल एका महिन्याच्या आत सार्वजनिक करावा लागतो. 

गेल्या महिन्यात 12 जून 2025 ला अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान काही सेकंदातच मेडिकल हॉस्टेलच्या इमारतीशी धडकलं. विशेष आणि चमत्कारिकरित्या या अपघातात विमानातील एक व्यक्ती वाचला आहे. स्विचचा मुद्दा नेमका काय घडला हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल? ब्लॅक बॉक्सच्या तपासणीतून अपघाताचे कारण समोर लवकरच येणार आहे. याआधी अमेरिकन अहवालातून तपासात एक नवीन दावा करण्यात आला आहे.  

अमेरिकन अहवालात कोणता दावा?

या अहवालात अमेरिकन अधिकाऱ्यांच्या सुरुवातीच्या तपासाचा हवाला देत म्हटलं आहे की, अपघाताची चौकशी वैमानिकांच्या कृतींवर केंद्रित आहे. डब्ल्यूएसजेने अपघाताची चौकशी करणाऱ्या काही अमेरिकन अधिकाऱ्यांचा हवाला देत दावा केला आहे की, सुरुवातीच्या निष्कर्षांवरून असं समोर आलं आहे की, जेटच्या दोन्ही इंजिनमधील इंधनाचा प्रवाह नियंत्रित करणारे स्विचेस बंद होते. यामुळे टेकऑफ झाल्यानंतर लगेचच हे मोठे नुकसान झाल्याचा दावा यात करण्यात आला आहे. डब्ल्यूएसजेच्या अहवालानुसार, या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांच्या मते, तपास कॉकपिटमधील इंधन नियंत्रण स्विचेसच्या हालचालीवर केंद्रित आहे. 

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, विमान अपघातांची कारणे सहसा अनेक असतात. या प्रकरणात, तपासकर्ते अपघाताशी संबंधित अनेक पैलूंचा शोध घेण्यात येत आहे. यामध्ये वैमानिकांची पार्श्वभूमी आणि अनुभव देखील पाहिला जातो. 

आतापर्यंत काय शोधले गेले?

- अपघातग्रस्त विमानात पूर्णपणे इंधन होतं. उड्डाण करताना विमान ठीक वाटत होते पण अचानक ते खाली येऊ लागले. 

- अहमदाबादमध्ये एआय 171 क्रॅश होण्यापूर्वी पायलटने मे डे अलर्ट जारी केला होता. 

तज्ज्ञ काय म्हणाले?

विमान वाहतूक तज्ज्ञ आणि लढाऊ वैमानिक जॉर्न फेहराम यांनी ब्लूमबर्गला सांगितलं की, व्हायरल व्हिडीओमध्ये असे दिसून आले आहे की, गियर (लँडिंग) लागू होईपर्यंत सर्वकाही सामान्य होतं, त्यानंतर लगेचच विमानाचा जोर कमी झाला. दोन्ही इंजिनमध्ये एकाच वेळी वीज गायब होणे हे अगदी असामान्य आहे. पक्षी धडकल्याचे संकेत देणारे धुराचे कोणतेही चिन्ह नाही. 787 ड्रीमलायनर सारख्या मोठ्या विमानांमध्ये एकाच इंजिनवर उडण्यासाठी पुरेशी शक्ती असते आणि वैमानिक या परिस्थितीसाठी पूर्णपणे तयार असतात. 

Read More