Marathi News> भारत
Advertisement

Ahmedabad Plane Crash: 260 पैकी 259 जणांचे डीएनए जुळले; एअर इंडिया विमान अपघातातील तो मृतदेह कोणाचा?

Ahmedabad Plane Crash: आतापर्यंत एकूण 258 मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. 

Ahmedabad Plane Crash: 260 पैकी 259 जणांचे डीएनए जुळले; एअर इंडिया विमान अपघातातील तो मृतदेह कोणाचा?

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एआय 171 विमान अपघाताला जवळजवळ दोन आठवडे झाले आहेत. या विमानातील प्रवाशांचा आणि विमान ज्या जागी कोसशले त्या हॉस्टेलमधील नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते. दरम्यानच्या काळात तज्ज्ञांनी आतापर्यंत एकूण 259 मृतदेह ओळखले आहेत. ज्यात 240 प्रवासी आहेत. यापैकी 240 लोक विमानात होते. तर 13 जण जमिनीवर झालेल्या अपघाताचे बळी ठरले. उर्वरित 6 जणांची चेहऱ्यावरील आणि शारीरिक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळख पटवण्यात आली आहे. फक्त एका मृतदेहाची ओळख पटवता आलेली नाही, ज्याचा डीएनए अद्याप जुळलेला नाही. ती व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

एक मृतदेह अजूनही सिव्हिल हॉस्पिटलच्या शवगृहात

बुधवारी एका ब्रिटिश नागरिकाचे अवशेष त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले. यासह आतापर्यंत एकूण 258 मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. फक्त एक मृतदेह आमच्याकडे आहे. ज्याची ओळख पटवता आलेली नाही. मृतांचे नातेवाईक अंतिम संस्कार करण्याची तयारी करत आहेत, अशी माहिती सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्याने दिली. 

उर्वरित मृतदेह कदाचित भारतीय प्रवाशाचा

ज्या प्रवाशाची ओळख पटलेली नाही तो भारतीय नागरिक आहे. कारण विमानातील सर्व 52 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिकाची ओळख पटली आहे. अपघातात वाचलेल्या एकमेव व्यक्तीचे नाव विश्वासकुमार रमेश आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

जळालेल्या अवशेषांचे नमुने देखील घेतले

गंभीरपणे जळालेल्या मृतदेहांमधून डीएनए काढण्याचा प्रयत्न फॉरेन्सिक तज्ञ करत आहेत. आम्ही कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. शेवटच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याची माहिती  एका अधिकाऱ्याने दिली. इतक्या कमी वेळात डीएनएद्वारे 253 लोकांची ओळख पटवणे हा एक विक्रम आहे. सर्व ओळख आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात आली आहेत. जेणेकरून मृतांचे नातेवाईक अंत्यसंस्कार आणि भरपाईची प्रक्रिया पूर्ण करू शकतील, असा दावा राज्य आरोग्य विभागाने केलाय.

ब्लॅक बॉक्समधील डेटा सापडला

विमानात असलेल्या ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळाला आहे. मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या ठिकाणी मिळालेल्या विमानातील ब्लॅक बॉक्सच्या एका भागाचे जास्त नुकसान झाले होते. विमान क्रॅश झाल्यानंतर त्याला लागलेल्या जोरदार फटक्यामुळे हे झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळेच ब्लॅक बॉक्स अमेरिका, ब्रिटन किंवा सिंगापुर पाठवावा यावर विचार केला जात आहे. तर ब्लॅक बॉक्सच्या दुसऱ्या भागाची तपासणी भारतातील एका लॅबमध्ये केली जाऊ शकते. 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय-१७१ विमानाने उड्डाण केल्यानंतर ३६ सेकंदातच ते क्रॅश झाले. ड्रीमलाइनर विमानाच्या ढिगाऱ्यातून ब्लॅक बॉक्स सापडला. त्याचे दोन भाग आहेत. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर). यांना एकत्रितपणे ब्लॅक बॉक्स म्हणतात. हा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या कारणाबद्दल ठोस माहिती देऊ शकतो. हा ब्लॅक बॉक्स उड्डाणाच्या शेवटच्या क्षणांच्या हालचाली जसे की उंची, वेग आणि कॉकपिटमधील संभाषणाची माहिती रेकॉर्ड करतो.

Read More