Marathi News> भारत
Advertisement

'मी उडी मारली नाही, तर....', दुर्घटनेतून बचावलेला एकमेव प्रवासी रमेशने सांगितला सगळा घटनाक्रम, 'माझ्या डोळ्यांसमोर एअर होस्टेस...'

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत विमानातील सर्व ठार झाले असताना, आश्चर्यकारपणे फक्त रमेश विश्वासकुमार हा एकमेव प्रवासी वाचला आहे. हा चमत्कार नेमका घडला कसा याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे.   

'मी उडी मारली नाही, तर....', दुर्घटनेतून बचावलेला एकमेव प्रवासी रमेशने सांगितला सगळा घटनाक्रम, 'माझ्या डोळ्यांसमोर एअर होस्टेस...'

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत विमानातील सर्व ठार झाले असताना, आश्चर्यकारपणे फक्त रमेश विश्वासकुमार हा एकमेव प्रवासी वाचला आहे. यानंतर अनेकजण हा चमत्कार असल्याचं म्हणत आहेत. तर अनेकांनी हे कसं काय शक्य झालं? असा प्रश्न सतावत आहे. या प्रश्नाचं उत्तर स्वत: रमेश विश्वासकुमारने दिलं आहे. दरवाजा तुटल्याने त्या जागेतून मी बाहेर उडी मारली असं त्याने डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

Ahmedabad Plane Crash: रमेश विश्वासकुमार नव्हे तर ही आहे जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती; 7 वेळा मृत्यूला दिली आहे हुलकावणी

 

एअर इंडियाच्या विमानाचा 625 फूट उंचीवरुन खाली कोसळल्यानंतर स्फोट झाला होता. मात्र तरीही सीट क्रमांक 11-A वर बसलेला रमेश विश्वासकुमार आश्चर्यकारकरित्या त्यातून बचावला. रमेश ब्रिटीश नागरिक आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखत त्याने संपूर्ण घटनाक्रम उलगडला आहे. दरम्यान याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी विचारपूस केली. दुर्घटना कशी झाली याबद्दलही त्यांनी विचारल्याची माहिती रमेशने दिली. 

अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 7 जणांचा मृत्यू; वाचा संपूर्ण यादी आणि सविस्तर माहिती

 

"सर्व काही माझ्या डोळ्यांसमोर झालं. मी त्यातून जिवंत कसा वाचलो यावर माझाही विश्वास बसत नाही आहे. थोड्या वेळासाठी आपलाही मृत्यू होईल असं मला वाटलं होतं. पण डोळे उघडल्यानंतर मी जिवंत असल्याचा भास झाला. मी सीटचा बेल्ट काढण्याचा प्रयत्न केला आणि निघालो. माझ्या डोळ्यांसमोर एअर होस्टेस आणि इतरजण जळाले," असं रमेशने सांगितलं. 

"टेक ऑफ झाल्यानंतर 5-10 सेकंदासाठी विमान अडकलं होतं. नंतर लाईट सुरु झाल्या. विमान उडावं यासाठी प्रयत्न होत होते. पण विमान हॉस्टेलवर पडलं. माझ्या डोळ्यांसमोर झालं," असा खुलासा त्याने केला. 

"मी ज्या बाजूला होतो ती बाजू हॉस्टेलवर लँड झाली नाही. तळमजल्यावर माझी बाजू लँड झाली होती. मी जिथे लँड झालो, ती खालची बाजू होती आणि थोडी जागा होती. दरवाजा तुटल्यानंतर जागा दिसली तर मी निघण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला भिंत असल्याने कोणी निघू शकलं नसणार. मी कसं वाचलो हे मलाच माहिती नाही. आगीमुळे माझा डाव हात भाजला. नंतर मला रुग्णवाहिकेतून घेऊन आले," अशी माहिती त्याने दिली आहे. 

Read More