Marathi News> भारत
Advertisement

'मागे आगडोंब, पुढे रमेश...' प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या प्रवाशाचा नवा व्हिडीओ, पाहून बसणार नाही विश्वास!

 Ahmedabad Plane Crash:  अपघातातून वाचलेला रमेश कुमार विश्वास रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय. 

'मागे आगडोंब, पुढे रमेश...' प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या प्रवाशाचा नवा व्हिडीओ, पाहून बसणार नाही विश्वास!

Ahmedabad Plane Crash:  12 जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच एअर इंडियाचे विमान AI-171 कोसळले. यानंतर संपूर्ण देश हादरून गेला. विमानातील 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. पण या विनाशात एक चमत्कार घडला रमेश कुमार विश्वास भीषण विमान अपघातातून वाचला.  अपघातातून वाचलेला रमेश कुमार विश्वास रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय. ज्यामध्ये विमान जळताना दिसतंय आणि धुराचे मोठे लोण दिसतायत. यातून विश्वास कुमार रमेश तेथून बाहेर येतोय.

विश्वास कुमार रमेश अपघातस्थळावरून बाहेर पडला

विश्वास कुमारचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये तो अपघातस्थळावरून बाहेर पडताना दिसतोय. अपघाताची भीषणता आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या किंकाळ्या व्हिडिओमध्ये सर्वकाही सांगत आहेत. विश्वास कुमार रमेश आगीच्या ज्वाळा आणि धुराच्या मध्ये चालत बाहेर येतो. तिथे उपस्थित असलेले लोक त्याला त्यांच्यासोबत घेऊन जातात. सागर पटोलिया यांनी हा व्हिडिओ X वर शेअर केला आहे.

हा नवीन व्हिडिओ कसा आहे?

विश्वास कुमारच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, तो विमान क्रॅश झालेल्या ठिकाणाहून हातात मोबाईल घेऊन बाहेर पडताना दिसतोय. विमानाच्या पुढच्या भागात जोरदार ज्वाळा दिसत आहेत आणि आकाशात फक्त धूर दिसतोय. बाहेर उभे असलेले लोक आगीतून येणाऱ्या विश्वास कुमारला पाहून आश्चर्यचकित होतात.तो विमानातून बाहेर आलाय आणि त्याला त्वरित उपचारांची आवश्यकता असल्याचे त्यांना कळते आणि ते रमेश कुमार विश्वासला रुग्णवाहिकेत पाठवतात.

बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले विमान 

12 जून रोजी एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर 787 विमान 171 अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले, तर रमेश कुमार विश्वास वाचणे हा एक चमत्कार मानला जातोय. एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई विमानतळावरून लंडनच्या गॅटविकला जाणार होते. विश्वास कुमार रमेश 11ए सीटवर बसले होते. विमानाने उड्डाण केले आणि काही सेकंदातच बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात धडकले. सीट 11ए आपत्कालीन एक्झिटजवळ होती.

'मला वाटले की मी मरणार'

मला माझ्या वाचण्याची अपेक्षा नव्हती. मी जिवंत कसा बाहेर आलो यावर माझा विश्वास बसत नव्हता, असे रमेश कुमार विश्वासने सांगितले. मलाही वाटले की मी मरणार आहे. टेकऑफनंतर विमान थांबले आणि आतील दिवे चालू लागले. जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मला समजले की मी वाचलोय, असे तो म्हणाला.

सर्वात मोठा साक्षीदार

रमेश कुमार विश्वास हा भयानक घटनेचा सर्वात महत्वाचा साक्षीदार बनला आहे. त्याने त्याच्या डोळ्यांनी पाहिलेली दुर्घटना, त्याच्या शब्दांमध्ये मिसळलेल्या किंकाळ्या आणि अपघाताच्या भयानक आठवणी त्याच्या मनात नेहमीच राहतील. सोशल मीडियावर लोक विश्वासच्या धाडसाला सलाम करत आहेत आणि त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. AI-171 अपघात आता फक्त एक अपघात राहिलेला नाही, तर तो कधीही भरून न येणारी वेदना बनली आहे. या अपघातात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांचा या अपघातात मृत्यू झाला.

Read More