Marathi News> भारत
Advertisement

Video : आगीचे लोळ, वसतिगृहात धावपळ अन् विद्यार्थ्यांच्या उड्या...अहमदाबाद विमान अपघाताचा हृदयद्रावक व्हिडीओ

Ahmedabad Plane Crash New Video : अहमदाबाद विमान दुर्घटनेतील अजून एक हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे. एअर इंडियाचे विमान वसतिगृहावर पडल्यानंतर आगीचे लोळ आणि विद्यार्थी-कर्मचाऱ्यांची जीव वाचविण्यासाठी धावपळ, घटनेची दाहकता दाखवणारा हा व्हिडीओ अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकतोय.    

Video : आगीचे लोळ, वसतिगृहात धावपळ अन् विद्यार्थ्यांच्या उड्या...अहमदाबाद विमान अपघाताचा हृदयद्रावक व्हिडीओ

Ahmedabad Plane Crash New Video:  गुरुवारी 12 जूनला दुपारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं. त्यानंतर वसतिगृहातून आगीचे लोळ पाहिला मिळाले. या भयानक दुर्घटनेचा अजून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये बीजे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आगीपासून आपले प्राण वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये घटनेची दाहकता पाहिला मिळते. तुम्ही पाहू शकता जीव वाचविण्यासाठी विद्यार्थी आणि कर्मचारी हॉस्टेलच्या बाल्कनीतून उडी मारताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात एअर इंडियाचे विमान बोईंग 787-8 ड्रीमलायनरशी संबंधित या भयानक दुर्घटनेत विमानातील सर्व 241 जणांचा मृत्यू झाला. तर आश्चर्यकारकरित्या एकच व्यक्ती या भयानक दुर्घटनेतून बचावला. 

हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ!

विमान वसतिगृहावर विमान कोसळल्यानंतर भीषण आग लागली होती. त्यावेळी वसतिगृहात अनेक विद्यार्थी उपस्थित होते. आगीचे लोट पाहून या विद्यार्थ्यांनी बाल्कनीतून उड्या मारण्यास सुरुवात केली. यासंबंधीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, झी 24 तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही. अपघातस्थळ मेडिकल कॉलेज कॅन्टीन होते, जिथे घटनेच्या वेळी विद्यार्थी जेवण करत होते. घटनास्थळावरून मिळालेल्या फोटोमध्ये अपघातानंतर मोठी आग लागल्याचे पाहिला मिळाले होते, ज्यामध्ये डॉक्टर आणि विद्यार्थ्यांसह अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर, आगीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे कठीण झालं होतं. वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी बाल्कनीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग होता. पण हे सोपे नव्हतं. 21 सेकंदांच्या या व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये विद्यार्थ्यांना बाल्कनीतून उडी मारताना पाहिला मिळत आहे. या शतकातील भारतातील सर्वात भीषण विमान अपघातांपैकी एकाच्या समोर आलेल्या अनेक व्हिडीओंपैकी हा एक आहे. गेल्या आठवड्यात अशाच एका व्हिडीओमध्ये, एक महिला तिच्या अल्पवयीन मुलाला अपघातस्थळावरून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 15 वर्षीय आकाश पटणीचा मृत्यू झाला तर त्याची आई सीताबेन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना जखमी झाली.

दुसऱ्या व्हिडीओमध्ये अपघातातून वाचलेला एकमेव बचावलेला विश्वास कुमार रमेश अपघातस्थळावरून बाहेर पडताना दिसत आहे. 40 वर्षीय ब्रिटिश नागरिक विश्वास एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI171 च्या सीट क्रमांक 11 A वर बसला होता. तो पांढरा टी-शर्ट घालून बाहेर पडताना दिसत होता, त्याच्या डाव्या हातात मोबाईल फोन होता. स्थानिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. रमेश, ज्याला अजूनही तो कसा वाचला हे अविश्वसनीय वाटतं, त्याने मीडियाला सांगितले की सुरुवातीला त्याला वाटले की तो मरणार आहे, पण जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला जाणवले की तो जिवंत आहे. त्यानंतर त्याने त्याचा सीट बेल्ट काढला आणि अपघातस्थळावरून बाहेर पडला.

अहमदाबादहून लंडनला जाणारे हे विमान 230 प्रवासी, दोन पायलट आणि 10 क्रू मेंबर्स घेऊन जात होतं. उड्डाणानंतर 32 सेकंदातच ते कोसळलं. या दुर्घटनेत एकूण 265 मृत झाला असून यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश आहे. 

Read More