Marathi News> भारत
Advertisement

विमान क्रॅश होण्याआधी पायलट Mayday Mayday का ओरडतात? या कोडवर्डचा अर्थ काय?

Ahmedabad Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. 

विमान क्रॅश होण्याआधी पायलट Mayday Mayday का ओरडतात? या कोडवर्डचा अर्थ काय?

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना झाल्याची घटना घडली आहे. 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान गुजरातमधल्या मेघानी नगरमध्ये अपघातग्रस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेक-ऑफ केल्यानंतर काही वेळातच विमान खाली कोसळलं. हे विमान अहमदाबादहून लंडन येथे जात होते. विमान अपघातात अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाल्याचे व काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पण तुम्हाला माहितीये का? विमान अपघातादरम्यान पायलट Mayday Mayday असं का ओरडतात. आज आम्ही तुम्हाला या मागचं कारण सांगणार आहोत?

आपातकालीन परिस्थितीत प्रशासनाकडून किंवा तिथल्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून कोड वर्डचा वापर केला होता. या Mayday Mayday या शब्दांचा वापर पायलटसह सर्व एअरलाइन्सचे क्रू मेंबर्स एक दुसऱ्यांसोबत बोलताना कोडवर्डमध्येच सूचना देतात. हे कोडवर्ड क्रू मेंबर्सना अलर्ट करतात. या कोड वर्डमध्ये एक शब्द आहे तो म्हणजे Mayday Mayday हा आहे. पण या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीये का. या मागचा अर्थ जाणून घेऊयात. 

Mayday या शब्दाचा वापर आपतकालीन परिस्थितीत केला जातो. आपातकालीन परिस्थितीत पायलट Mayday हा शब्द तीन वेळा बोलतात. यामुळं क्रू मेंबर्स अलर्ट होतात. पायलटकडून या शब्दांचा वापर नेहमी नाही केला जात. Mayday या शब्दांचा वापर फक्त आपातकालीन स्थितीत केला जातो. आता तुम्ही विचार कराल की या कोडवर्डचा वापर करण्याऐवजी पायलट थेट का बोलत नाहीत. कारण विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धोक्याची सूचना मिळाली तर ते घाबरतील आणि फ्लाइटमध्ये धावपळ निर्माण होईल. यामुळं पायलट कोड वर्डचा वापर करतात. 

Mayday या शब्दाचा वापर डिस्ट्रेस कॉलमध्ये केला जातो. याचा अर्थ विमान आणि प्रवाशांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना मदतीची गरज आहे. आपातकालीन स्थितीत रेडिओ हस्तक्षेप आणि गोंधळाचे वातावरण असल्यामुळं पायलटला या शब्द तीनवेळा बोलावा लागतो. Mayday शब्दाची सुरुवात 1920मध्ये झाली होती. या दरम्यान लंडनच्या क्रॉडॉन एअरपोर्टवर रेडिओ ऑफिसर फ्रेडरिक स्टॅनली मॉकफॉर्ड यांनी सगळ्यात पहिले या शब्दाचा वापर केला होता. त्यांनी फ्रेंच शब्द 'm'aider' चा वापर करून Mayday शब्द तयार झाला. 'm'aider' या फ्रेंच शब्दाचा अर्थ आहे माझी मदत करा, असा आहे. 

Read More