Marathi News> भारत
Advertisement

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताच्या 'त्या' व्हिडीओमागील सत्य समोर; 17 वर्षाच्या आर्यनने सांगितलं 'त्या दिवशी तो...'

Ahmedabad Plane Crash : गुरुवारी एअर इंडियाचे विमान अपघात झाल्यानंतर काही क्षणात सोशल मीडियावर हा दुर्घटनेचा लाइव्ह व्हिडीओ व्हायरल झाला. असंख्य लोकांना प्रश्न पडला होता, घटनेचा व्हिडीओ कसा तयार झाला. हा व्हिडीओ फेक आणि खरा याबद्दलचं सत्य समोर आला आहे.     

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताच्या 'त्या' व्हिडीओमागील सत्य समोर; 17 वर्षाच्या आर्यनने सांगितलं 'त्या दिवशी तो...'

Ahmedabad Plane Crash गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान AI-171 कोसळलं आणि त्यात 241 जणांचा मृत्यू झालाय. या अपघातानंतर या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांना प्रश्न पडला की, अपघात होत असताना तो कॅमेऱ्यात कसा कैद झाला. त्यामुळे अपघात होत असताना तो कॅमेऱ्यात कैद होणे हा निव्वळ योगायोग आहे की तो व्हिडीओ फेक आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. अखेर या व्हिडीओमागील सत्य समोर आलं आहे. 17 वर्षीय आर्यनने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

काय आहे त्या व्हिडीओमागील सत्य?

आर्यन मेघानीनगरमध्येच राहत असून त्याने हा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. 17 वर्षीय आर्यन बारावीत शिकत असून लल्लंटॉपने त्याच्याशी संवाद साधला आहे. आर्यन म्हणाला की हा अपघात पाहिल्यानंतर तो खूप घाबरला आहे आणि कधीही विमानात बसणार नाही, असं त्याने सांगितलं आहे. गुरुवारी दुपारी 1:39 वाजता आर्यनने अपघाताचा व्हिडीओ बनवला. कारण त्याच्या मोबाईलमध्ये दाखवलेल्या व्हिडीओची ही वेळ आहे. आर्यन म्हणाला की त्याने हा व्हिडीओ त्याच्या वडिलांना पाठवला आहे. कदाचित त्यांनी हा व्हिडीओ दुसऱ्या कोणाला तरी पाठवला असणार आहे. 

तर आर्यनच्या बहिणीने सांगितले की, माझा भाऊ पहिल्यांदाच इथे आला होता, तो गावात राहतो. जेव्हा आर्यनने पहिल्यांदाच विमान इतकं खाली पाहिले तेव्हा त्याने त्याच्या फोनवर व्हिडीओ रेकॉर्ड केला. जेणेकरून तो गावात जाऊन त्याच्या मित्रांना सांगू शकेल की मेघनीनगरमधील त्याच्या घराजवळून विमाने उडतात. आर्यनच्या बहिणीने सांगितलं की माझा भाऊ नेहमीप्रमाणे व्हिडीओ बनवत होता, पण दुर्दैवाने ते क्रॅश झाले. आर्यनने कधीही विमान इतक्या जवळून पाहिले नव्हतं. 

आर्यनचे शेजारी शुभम गुप्ता म्हणाले की, अपघातग्रस्त एअर इंडियाचे विमान खूप खाली उडत होते. ते विमान सामान्यपणे उडत नव्हते. त्याची हालचाल पाहून असे वाटले की ते अपघातग्रस्त होऊ शकते. त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणाहून व्हिडीओ बनवण्यात आला आहे ते मेघानी नगरमधील ओंकार नगर कॉर्नर आहे, पण ज्या ठिकाणी विमान कोसळले ते मेघानी नगरचे आयजीपी कंपाऊंड आहे. विमान कोसळताच खूप मोठा आवाज ऐकू आला, जेव्हा आम्ही छतावर येऊन पाहिले तेव्हा आकाशात धूर होता.

अहमदाबाद पोलिसांनी या व्हिडीओबद्दल आर्यनची चौकशी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, व्हिडीओ बनवल्याबद्दल कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मोबाईल व्हिडीओचे स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओची माहिती पोलिसांना दिली. तो त्याच्या वडिलांसोबत साक्षीदार म्हणून जबाब देण्यासाठी आला होता, त्यानंतर त्याला त्याच्या वडिलांसोबत पाठवण्यात आले. अद्याप कोणालाही अटक किंवा ताब्यात घेण्यात आलेले नाही. 

Read More