Marathi News> भारत
Advertisement

रेल्वे स्थानकांत महिलाच्या सुरक्षेची जबाबदारी आता AI च्या खांद्यावर; रेल्वेचा मास्टर प्लॅन वाचाच

Indian Railway Crime News: रेल्वे स्थानकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी AI-आधारित Facial Recognition System बसवण्यात येणार आहे. 

रेल्वे स्थानकांत  महिलाच्या सुरक्षेची जबाबदारी आता AI च्या खांद्यावर; रेल्वेचा मास्टर प्लॅन वाचाच

Crime News: महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. हल्ली रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलादेखील सुरक्षित नाहीत. महिलांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की, प्रमुख रेल्वे स्थानकांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चेहरा ओळख तंत्रज्ञान (Facial Recognition System) लागू करण्याची योजना आहे. या तंत्रज्ञानाचा उद्देश लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचा मागोवा घेणे आणि रेल्वे स्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेला बळकटी देणे हा आहे.

योजनेची वैशिष्ट्ये आणि उद्देश

या योजनेंतर्गत, भारतीय रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर AI-आधारित कॅमेरे बसवले जाणार आहेत, जे चेहरा ओळख तंत्रज्ञानाद्वारे संशयित व्यक्तींना ओळखतील. हे तंत्रज्ञान रेल्वे स्थानकांसारख्या गर्दीच्या ठिकाणी लैंगिक गुन्हे करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वापरले जाईल. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, हे तंत्रज्ञान गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा मागोवा घेण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी ठरेल.

AI-आधारित Facial Recognition System सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मिळालेल्या फुटेजचे विश्लेषण करते आणि संशयितांचे चेहरे पोलिसांच्या गुन्हेगारी डेटाबेसशी जुळवते. हे तंत्रज्ञान अत्यंत वेगाने काम करते आणि काही मिलिसेकंदात लाखो रेकॉर्ड्समधून चेहरा जुळवू शकते. उदाहरणार्थ, दिल्ली पोलिसांनी अशा तंत्रज्ञानाचा वापर करून सप्टेंबर ते नोव्हेंबर 2024 दरम्यान 70 चोर आणि स्नॅचिंग करणाऱ्यांना अटक केली होती. या तंत्रज्ञानात अस्पष्ट प्रतिमांमधूनही चेहरा ओळखण्याची क्षमता आहे, ज्यामुळे कमी दर्जाच्या सीसीटीव्ही फुटेजद्वारेही संशयितांना शोधणे शक्य होते.

रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर तीन वर्षांत प्रवाशांची 95 हजार गाऱ्हाणी

मुंबईची जीवनवाहिनी माणजेच उपनगरीय रेल्वेने केला जाणारा प्रवास म्हणजे दररोज नव्या समस्या असा अलिखित नियम झाला असतानाच लोकलमध्ये प्रवाशांसमोरच्या अडचणीची जंत्री चहल्यानंतरही संपत नाही. कधी घाईगडबडीत सोकलमध्येच विसरलेली वस्तु, तर कधी गर्दीच्या रेट्यातून लोकलमध्ये चढताना लागलेल्या धक्क्याने भांडणाला मिळणारे निमित्त. अशा अनंत अडचणीसाठी प्रवासी मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या 1512 हेल्पलाइनवर फोन करतात प्रवासाकडून येणाऱ्या तक्रतीच्या संख्येत तब्बल 60 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.

Read More