Marathi News> भारत
Advertisement

सेन्सॉरकडून 'पद्मावती'ला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ओवेसी भडकले

संजयलीला भंसाळींचा बहुप्रतिक्षित आणि २०१७मध्ये वादविवादांमुळे चर्चेमध्ये आलेला 'पद्मावती' अखेर रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.

सेन्सॉरकडून 'पद्मावती'ला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ओवेसी भडकले

मुंबई : संजयलीला भंसाळींचा बहुप्रतिक्षित आणि २०१७मध्ये वादविवादांमुळे चर्चेमध्ये आलेला 'पद्मावती' अखेर रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.

रणवीर सिंग , दीपिका पादुकोण , आणि शाहीद कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाला 'युए' सर्टीफिकेट मिळाले आहे. त्यामुळे अखेर लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.  

ओवेसींचे ट्विट  

हैदराबाद येथील एमआयएमचे खासदार असउद्दीन ओवेसी यांनी सेन्सर बोर्डच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. ओवेसींनी केलेल्या ट्विटनुसार २ तासाच्या चित्रपटासाठी संघटनांसोबत बोलणी केली जाते. मात्र मुस्लीम महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि न्यायासाठी कोणतीच बोलणी केली जात नाही.  

 

ट्रिपल तलाक 

ट्रिपल तलाकमुळे मुस्लीम महिलांना न्याय मिळणार नाही. भविष्यात मुस्लीम महिलांच्या न्यायासाठी प्रयत्न केले जातील, हा संघर्ष चालू  राहिल अशी प्रतिक्रियादेखील ओवेसींनी दिली होती.  

Read More