Marathi News> भारत
Advertisement

अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेबाबत Air India ने केलेल्या चौकशीत धक्कादायक खुलासा! स्विच सिस्टममध्ये कोणताही दोष नव्हता, तर...

अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेबाबत  Air India ने  केलेल्या चौकशीत धक्कादायप खुलासा समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

 अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेबाबत  Air India ने  केलेल्या चौकशीत धक्कादायक खुलासा! स्विच सिस्टममध्ये कोणताही दोष नव्हता, तर...

Air India Plane Crash : अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेबाबत परदेशी तपास यंत्रणांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. अशातच आता Air India ने  केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.  १२ जून रोजी क्रॅशपूर्वी नेमके काय घडले होते याचा खुलासा कंपनीने केला आहे. तसेच एअर इंडियाला विमानाच्या इंधन नियंत्रण स्विच सिस्टममध्ये कोणताही दोष आढळला नाही. मग, नमेकं घडलं काय? जाणून घेऊया. 

एअर इंडियाने त्यांच्या सर्व बोईंग 787 आणि 737 विमानांच्या इंधन नियंत्रण स्विच (FCS) लॉकिंग यंत्रणेची तपासणी पूर्ण केली आहे.  आणि त्यामध्ये कोणतीही समस्या आढळलेली नाही. ही तपासणी 12 जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या अपघातानंतर करण्यात आली. एका निवेदनात, एअरलाइनने म्हटले आहे की तपासणी दरम्यान इंधन स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही.

12 जून 2025 रोजी झालेल्या भीषण विमान अपघाताची कसून चौकशी केली जात आहे. त्या दिवशी एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर अहमदाबादहून लंडन गॅटविकला उड्डाण करत होते, परंतु टेकऑफ झाल्यानंतर लगेचच ते एका इमारतीवर कोसळले. या अपघातात 260 लोकांचा मृत्यू झाला, यात इमारतीमधील 19 लोकांचा समावेश होता. विमानातील 242  प्रवाशांपैकी फक्त एकच प्रवासी वाचला.

12 जुलै रोजी डीजीसीएच्या अधिकृत सूचनांपूर्वीच या अपघाताची चौकशी सुरू केल्याची माहिती एअर इंडियाने दिली. कंपनीने सांगितले की ही चौकशी निर्धारित वेळेत पूर्ण झाली आहे आणि त्याची माहिती नियामकालाही देण्यात आली आहे. ही चौकशी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन्ही विमानांच्या ताफ्यावर करण्यात आली "तपासणीदरम्यान, लॉकिंग यंत्रणेत कोणतीही समस्या आढळली नाही.  नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) भारतात उड्डाण करणाऱ्या बोईंगसह इतर विमानांच्या इंधन नियंत्रण स्विच सिस्टमची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर या तपासाला पुष्टी मिळाली आहे असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.

12 जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या 15 पानांच्या प्राथमिक अहवालात असे दिसून आले आहे की उड्डाणाच्या एका सेकंदात, इंजिनमधील इंधन स्विच 'RUN' वरून 'CUT OFF' मोडवर गेले, ज्यामुळे इंजिनांना इंधन पुरवठा गोठला आणि अपघात झाला. अहवालानुसार, 180 नॉट्सचा वेग गाठल्यानंतर विमान एकूण 30 सेकंदांत कोसळले. तथापि, उड्डाणादरम्यान इंधन स्विच कसे बंद झाले याची पुष्टी अहवालात करण्यात आलेली नाही.

Read More