Marathi News> भारत
Advertisement

Air India Plane Crash: 'ते टिंडर डेटवर गेलेले दोघे नव्हते' पायलटवरील आरोपांनंतर इंडियन एक्सपर्टची सणसणीत चपराक!

Air India Plane Crash: अमेरिकन तपास संस्था आणि वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने भारतीय पायलटवर आरोप केला होता.

Air India Plane Crash: 'ते टिंडर डेटवर गेलेले दोघे नव्हते' पायलटवरील आरोपांनंतर इंडियन एक्सपर्टची सणसणीत चपराक!

Air India Plane Crash: 12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 बोइंग 787-8 ड्रीमलाइनरचा भीषण अपघात झाला. उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत ते अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळले. या भीषण अपघातात विमानातील 242 पैकी 241 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर जमिनीवर असलेल्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल परिसरातील 19 जणांसह एकूण 260 जणांचा मृत्यू झाला. सीट ११ए वर बसलेला रमेश विश्वास कुमार नावाचा एकमेव प्रवासी चमत्कारिकरित्या जिवंत बचावला. दरम्यान अमेरिकन तपास संस्थेने पायलटवर याचा ठपका ठेवला. पण याला आता भारतातील एक्सपर्टने उत्तर दिलंय. 

अमेरिकन तपास संस्था आणि वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने भारतीय पायलटवर आरोप केला होता. फ्यूयल बंद केल्याने हा अपघात झाल्याचा तर्क सांगण्यात आला. दरम्यान यावर भारतीय वैमानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी एका तज्ज्ञाने अमेरिकन वृत्तपत्र आणि एजन्सीला जोरदार फटकारत पायलटचा बचाव केलाय. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने पायलट सुमित सभरवालवर इंधन स्विच कापल्याचा संशय व्यक्त केला. माध्यमांत आलेल्या वृत्तपत्रानुसार व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये, 'तुम्ही इंधन स्विच का बंद केला?' असे सह-वैमानिक क्लाइव्ह सुंदरने भीती आणि आश्चर्याने विचारले होते. यावर सुमित सभरवाल त्यावेळी शांत दिसत होते.

भारतीय तज्ज्ञाने दिले सडेतोड उत्तर 

एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया (एएलपीए इंडिया) चे प्रमुख कॅप्टन सॅम थॉमस यांनी या तर्कावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. तपासावर लक्ष ठेवणाऱ्या तज्ञांना दोन गोष्टी खटकतायत. पहिली गोष्ट तर तर्क आणि दुसरी गोष्ट म्हणजे एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) च्या अहवालात कोणताही अनुभवी तज्ज्ञ नव्हता. प्रश्न तर्काचा आहे तर आम्हाला मीडियाकडून तर्क लावण्यावर कोणताही आक्षेप नाही. तर्क हा शोध पत्रकारितेचा एक चांगला भाग आहे, यावर आम्हाला विश्वास आहे. पण आम्हाला त्या तथाकथित तज्ञांवर आक्षेप आहे. कारण पायलट्सना विमाने उडवण्याचा अनुभव आहे. त्यांना प्रत्येक परिस्थितीची जाणीव आहे. एनडीटीव्हीशी बोलताना थॉमस यांनी ही माहिती दिली. 

पक्ष्यांच्या धडकेबद्दल वेळोवेळी वेगवेगळी विधाने करणारे

पहिल्या दिवशी त्यांनी सांगितले की ते पक्ष्यांच्या धडकेमुळे अपघात झाला आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हटले की ते एक ओव्हरलोडेड विमान होते. तिसऱ्या दिवशी त्यांनी दुसरेच काही सांगितले. आम्हाला ज्या गोष्टीवर आक्षेप आहे ती म्हणजे तुम्ही त्यांना चौथ्या दिवशी का फोन केला? असा प्रश्न थॉमस यांनी विचारला. तुम्ही त्यांना पाचव्या, सहाव्या दिवशी फोन केला, जोपर्यंत त्यांनी असे सूचित केले नाही की कॅप्टनने स्वतःचा जीव घेण्याच्या उद्देशाने हे केले आहे. हे सत्य नाही. हा अहवाल पूर्णपणे भारताच्या नियंत्रणाखाली आहे असे मला वाटत नाही, उलट हा एक प्रकारचा 'हकमानामा'सारखा वाटत असल्याचेही थॉमस म्हणाले. .

'हे दोघे टिंडर डेटवर नाहीत'

घटनेचे गांभीर्य समजून घ्या. तुम्हाला FADEC चे पूर्ण नावही बरोबर लिहिता येत नाही आणि तुम्हाला पायलट सुमित सभरवालचा परवाना जारी करण्याची तारीखही बरोबर लिहिता येत नाही. मी तुम्हाला संपूर्ण अहवाल वाचण्याची अपेक्षा कशी करू शकतो? असा प्रश्न थॉमस यांनी विचारला. मला त्या तीन ओळींपलीकडे पहायचे नाही. तुम्ही कोणाच्या तरी आदेशावरून निवडकपणे एक ओळ सोडलीय. आता कोणी कोणाला काय म्हटले हे आम्हाला माहित नाही. संभाषणाचा एक सूर असतो. हे दोघे टिंडर डेटवर नाहीत. म्हणून कृपया जबाबदारीने वागा, असे थॉमस म्हणाले.

Read More