Air India Plane Crash: अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अर्थात DGCA ची सर्वात मोठी कारवाई केली आहे. एअर इंडियाच्या 3 बड्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेच्या चौकशीत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सुरक्षेत अत्यंत गंभीर चुका आढळून आल्या आहेत.
12 जून 2025 रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये भयानक दुर्घटना घडली. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं बोईंग विमानाने टेक ऑफ केले. उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात कोसळलं.या विमानातून 242 जण प्रवासी करत होते. त्यातील 241 जणांचा मृत्यू झाला.
DGCA ने एअर इंडियाला क्रू शेड्यूलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व भूमिका आणि जबाबदाऱ्यांमधून "ऑपरेशनल त्रुटींसाठी जबाबदार" असलेल्या तीन अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. 20 जून रोजी हा आदेश देण्यात आला होता. एव्हिएशन वॉचडॉगने एअर इंडियाला विलंब न करता अधिकाऱ्यांविरुद्ध अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यास सांगितले आहे. फ्लाइट क्रू शेड्यूलिंगशी संबंधित गंभीर आणि वारंवार उल्लंघनाच्या प्रकरणानंतर, एअर इंडियाच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विमान कंपनीने निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींवरून असे दिसून आले की अनिवार्य परवाना, विश्रांती आणि विश्रांतीचे नियम पूर्ण न करताही विमान कर्मचारी वेळापत्रकानुसार प्रवास करत होते. अशा परिस्थितीत, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, डीजीसीएने 3अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. दोषी कर्मचाऱ्यांना तात्काळ नोकरीवरून काढून टाकावे, असे आदेशात म्हटले आहे.
अहमदाबाद विमान अपघातानंतर एअरबस विमाने आणि ड्रीमलायनर विमानांची विशेष तपासणी वेगाने केली जात आहे. अपघाताची चौकशी अजूनही सुरू आहे. ब्लॅक बॉक्सची प्राथमिक माहिती देखील गोळा केली जात आहे. टेकऑफशी संबंधित तांत्रिक बिघाडामुळेही अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.