Marathi News> भारत
Advertisement

तरुणाने 60 वर्षीय महिलेला लिव्ह -इनमध्ये आणलं आणि मग नातं टिकण्याआधी कोर्टाचं दार ठोठवलं

Weird Love Story: गेल्या 6 वर्षांपासून रामकली आणि भोलू लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. दोघांना पुढे एकत्र राहायचं आहे. यासाठी दोघांनी आधीच न्यायालयात धाव घेतली.

तरुणाने 60 वर्षीय महिलेला लिव्ह -इनमध्ये आणलं आणि मग नातं टिकण्याआधी कोर्टाचं दार ठोठवलं

ग्वाल्हेर :  प्रेमात लोकं सगळंकाही विसरतात. प्रेमात लोकं इतकं वाहवत जातात की, ते जगाचा विचार करणं सोडतात. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात पाहायला मिळाला. 67 वर्षीय रामकली आणि 28 वर्षीय भोलू प्रेमात पडले आणि आता दोघांनी एकत्र राहण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

रामकली आणि भोलू यांच्या वयात 39 वर्षांचे अंतर

रामकली आणि भोलू लिव्ह-इनमध्ये राहत असून आता त्यांना त्यांचे भावी आयुष्यही याच पद्धतीने घालवायचे आहे. यासाठी त्यांनी ग्वाल्हेर न्यायालयात नोटरी बनवली आहे. रामकली आणि भोलू सांगतात की आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो. ते गेल्या 6 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत असून यापुढेही त्यांना एकत्र राहायचे आहे. लिव्ह-इन रिलेशनमध्ये असताना, भविष्यात कोणताही वाद होऊ नये आणि त्यांचे नाते पूर्वीपेक्षा अधिक दृढ व्हावे, यासाठी त्यांनी त्यांचे नाते नोटरी केले.

वकिलाने या जोडप्याची दिली माहिती 

वकील दिलीप अवस्थी यांनी सांगितले की, हे जोडपे मुरैना जिल्ह्यातील कैलारसचे रहिवासी आहेत. 67 वर्षीय रामकली आणि 28 वर्षीय भोलू प्रेमात आहेत आणि त्यांना एकमेकांसोबत राहायचे आहे, पण लग्न करायचं नाही. लिव्ह-इन रिलेशनमध्ये असताना वाद होऊ नयेत, म्हणून दोघांनी नोटरी करून घेतली आहे. नोटरीसाठी त्यांनी ग्वाल्हेरच्या जिल्हा न्यायालयात लिव्ह-इन रिलेशन असल्याची कागदपत्रे सादर केली आहेत.

वाद टाळण्यासाठी लिव्ह इन रिलेशनची नोटरी

fallbacks

अॅडव्होकेट असोसिएशनचे सचिव अॅडव्होकेट दिलीप अवस्थी यांच्या मते, वाद टाळण्यासाठी हे जोडपे लिव्ह-इन रिलेशनशिपची नोटरी तयार करतात.  अशा कागदपत्राला कोणतेही कायदेशीर आधार नाही. सं असलं तरी, 67 वर्षीय रामकलीच्या 28 वर्षीय भोलूवरील प्रेमाची कहाणी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

Read More