Marathi News> भारत
Advertisement

अखिलेश यादव मुख्यमंत्री योगी यांना विधानसभेत आव्हान देणार, विरोधी पक्षनेतेपदी निवड

Akhilesh Yadav  : समाज वादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव योगी सरकारवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, अखिलेश यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

अखिलेश यादव मुख्यमंत्री योगी यांना विधानसभेत आव्हान देणार, विरोधी पक्षनेतेपदी निवड

लखनऊ : Akhilesh Yadav  : समाज वादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते म्हणून अखिलेश यादव विधानसभेत विरोधी पक्षाची भूमिका बजावतील आणि सरकारवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, अखिलेश यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

लालजी वर्मा यांनी सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना विरोधी पक्षनेते बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि राजेंद्र चौधरी यांनी त्याला पाठिंबा दिला होता. यानंतर ज्येष्ठ आमदार आलम बदी आझमी यांच्यासह सर्व नवनिर्वाचित आमदारांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

सपा विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत अखिलेश यादव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याची माहिती सपा नेते नरेश उत्तम यांनी दिली. प्रबळ विरोधी पक्षासाठी अखिलेश यादव विधानसभेत महत्त्वाची भूमिका बजावतील.

उल्लेखनीय बाब म्हणजे अखिलेश यादव मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांचा पराभव केला आहे.

अखिलेश यादव हे यूपीच्या आझमगड लोकसभा मतदारसंघातून खासदारही होते. त्यांनी नुकताच खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभेत राहून उत्तर प्रदेशात सपा संघटन मजबूत करण्यावर ते भर देणार आहेत, अशी माहिती सपाकडून देण्यात आली.

Read More