Marathi News> भारत
Advertisement

अक्षय्य तृतीयेला दागिने घ्याच, सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात घट झाली की वाढ जाणून घ्या आजचा दर काय आहे.

अक्षय्य तृतीयेला दागिने घ्याच, सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today:  आज अश्रय्य तृतीया आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभं मानलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळं ग्राहक काळजीत पडले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून सोन्याचे दर उतरणीला लागले होते. आजही सोन्याच्या दरात किंचीत घसरण झाली आहे. त्यामुळं अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही सोनं खरेदी करु शकणार आहे. सोन्याचा जुनचा वायदा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर 0.4 टक्क्याने म्हणजेच 384 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 95,353 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही 0.77 टक्के म्हणजेच 749 रुपयांनी कमी होऊन 96,113 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील सोन्याचे दर घसरले आहेत. डॉलर वधारल्यामुळं आणि आणि व्यापार युद्ध थंडावल्यामुळं त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतोय. स्पॉट गोल्ड  0.2 टक्कांनी घसरून $3,308.32 औंसवर पोहोचले आहे. तर, युएस गोल्ड फ्युचर 0.5 टक्क्यांने घसरून  $3,317.50 वर पोहोचले आहे. 

मुंबईत सोन्याच्या किंमती कशा असतील. 

24 कॅरेट सोनं प्रतिग्रॅम 9,798 वर स्थिरावले आहे. तर, 22 कॅरेट सोनं प्रतिग्रॅम 8,981 प्रतिग्रॅमवर पोहोचलं आहे. 

काय आहेत सोन्याचे दर!

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  89,750 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 97,910 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  73,440 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट  8,975 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   9,791 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    7,344 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट  71,800 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट  78,328 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट   58,752  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-   89,750 रुपये
24 कॅरेट-  97,910 रुपये
18 कॅरेट-   73,440 रुपये

Read More