Marathi News> भारत
Advertisement

अयोध्या निर्णय: मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाकडून पुनर्विचाराची मागणी

ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची पत्रकार परिषद

अयोध्या निर्णय: मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाकडून पुनर्विचाराची मागणी

नवी दिल्ली : अयोध्येवर आलेला निर्णय़ावर ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुस्लीम पक्षाचे वकील जफरयाब जिलानी यांनी म्हटलं की, 'आम्हाला बरोबरी आणि न्याय ही नाही मिळाला. निर्णयावर असहमती दर्शवणं आमचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्ट देखील कधी-कधी चुकीचं असू शकतं. कोर्टाने याआधीही आपल्या निर्णयांवर पुनर्विचार केलवा आहे. जर आमची वर्किंग कमिटी निर्णय घेईल तर आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करु.'

जफरयाब जिलानी यांनी म्हटलं की, 'आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो. निर्णयानंतर शांती आणि कायदा-सुव्यस्था कायम ठेवा. हा कोणाचाही विजय किंवा पराजय नाही. आम्ही पुढचा निर्णय घेऊ. पण निर्णय आमच्या आशेनुसार नाही आला. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीनंतर पुढचा निर्णय घेऊ.'

मुस्लीम पक्षाची बाजु ठेवणारे इकबाल अंसारी यांनी म्हटलं की, ;कोर्टाने जे म्हटलंय ते बरोबर आहे. आम्ही आधीपासूनच म्हणत होतो की, कोर्ट जो निर्णय़ देईल तो मान्य असेल. आता सरकारला निर्णय़ घ्यायचा आहे की, ते आम्हाला कुठे जमीन देणार आहेत.'

Read More