Marathi News> भारत
Advertisement

अयोध्या भुमिपुजनाआधी मुस्लिम लॉ बोर्डचे वादग्रस्त ट्वीट

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न 

अयोध्या भुमिपुजनाआधी मुस्लिम लॉ बोर्डचे वादग्रस्त ट्वीट

नवी दिल्ली : अयोध्येमध्ये राम जन्मभुमीचे पुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते काही वेळात होईल. त्यानंतर भव्य राम मंदिर निर्माणास सुरुवात होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचा निर्णय झाला. पण आता ऑल इंडीया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेयत. हागिया सोफिया मशिदीचे उदाहरण देत बाबरी मशिद कायम राहील असं म्हटलंय. 

बाबरी मशिद होती आणि कायम राहील असे ऑल इंडीया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने आपल्या अधिकृ ट्वीटर हॅंडलवरुन म्हटलंय. हागिया सोफिया याचे मोठे उदाहरण आहे. अन्यायकारक, लाजिरवाणा, एकतर्फी निर्णयाद्वारे जमीनीवर होणारे पुनर्निमाण इतिहास बदलू शकत नाही. दु:खी होण्याची गरज नाही. कोणतीही स्थिती कायम राहत नाही. असे मुस्लिम लॉ बोर्डने म्हटलंय. 

पुन्हा मशिदीत रुपांतरीत झालेली हागिया सोफिया ही १५०० वर्ष जुनी वास्तू जागतिक वारसामध्ये रुपांतरीत झालीय. जुलै महिन्यामध्ये टर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यब एर्दोगन यांनी ऐतिहासिक म्युझियम पुन्हा मशिदीत बदलण्याचे आदेश दिले. १४३४ मध्ये इंस्ताबुलवर हल्ला केल्यानंतर उस्मानीशाहीने मशिदीत बदललेल्या हागिया सोफियाला एक म्युझियम बनवले. या ऐतिहासिक वास्तूमध्ये अनेक बदल झाले. जेव्हा ही इमारत बनली तेव्हा भव्य चर्च होती. त्यानंतर हे मशिदीत रुपांतरीत झाली राष्ट्रपती एर्दोगन यांनी १९३४ मध्ये हा ऐतिहासिक निर्णय बदलला.

सहाव्या शतकातील चर्च

हागिया सोफिया जगातील सर्वात मोठ्या चर्चमधील एक आहे. ही सहाव्या शतकात बायजेंटाइन सम्राट जस्टिनियनने बनवले होते. त्यावेळी हे शहर कुस्तुनतुनिया किंवा कॉन्सटेनटिनोपोल नावाने ओळखले जायचे. इ.स ५३७ मध्ये या वास्तूला चर्च बनवण्यात आलं. 

भूमिपूजनासाठी एकूण 175 लोकांना श्री राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आलं आहे. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या जवळपास 135 संतांचा समावेश आहे. प्रत्येक आमंत्रण पत्रिकेवर सुरक्षेच्या दृष्टीने एक कोड बनवण्यात आला आहे.

Read More