Marathi News> भारत
Advertisement

लग्न होण्याआधीच नवरी मुलगी झाली आई पाहणारे थक्क

 सजलेल्या मंडपातून वरात परतल्याच्या अनेक घटना तूम्ही ऐकल्या असतील.

लग्न होण्याआधीच नवरी मुलगी झाली आई पाहणारे थक्क

मुंबई : सजलेल्या मंडपातून वरात परतल्याच्या अनेक घटना तूम्ही ऐकल्या असतील. मात्र या घटनेत काहीतरी विपरीतचं घडलंय. अचानक अ‍ॅम्ब्युलन्सला बोलावण्यात आले आणि नवरीला रूग्णालयात दाखल करण्यात आले. आणि नंतर जे डॉक्टर म्हणाला ते ऐकून नातेवाईकांच्या तोंडावर हसू आले. 

स्कॉटलंडमधील स्टर्लिंगशायरमध्ये राहणारे हेअरस्टायलिस्ट रेबेका मॅकमिलन आणि निक चीथम हे अनेक वर्ष एकत्रित राहिल्यानंतर लग्न करणार होत. या दोघांच्या लग्नाच्या सर्वतयारी झाली होती. मंडप सजला होता, 200 पाहूण्यांना लग्नाचे निमंत्रणही देण्यात आले होते. 

लग्नाच्या काही तास आधी रेबेकाला प्रसूतीच्या वेदना सूरू झाल्या. आणि लग्नाच्या वेशात नटलेल्या रेबेकाला थेट अ‍ॅम्ब्युलन्समधून रूग्णालयात दाखल करावे लागले. या अचानक घडलेल्या घटनेने हे लग्न रद्द करावे लागले आणि वरातीत आलेल्या नातेवाईकांना परतावे लागले.  

रेबेकाने दिली गोड बातमी 

डॉक्टरांनी रेबेकाची यशस्वीरीत्या प्रसुती केली. त्यामुळे लग्नाच्या दिवशीच रेबेकाने गोड बातमी दिली.  रेबेकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.  रॉरी इयान विल्यम चीथम असे त्याचे नाव आहे.विशेष म्हणजे, रेबेका लग्नाआधीच गर्भवती होती. प्रसूतीची तारीख 1 महिन्यानंतर होती. मात्र तारखे आधीच तिने मुलाला जन्म दिला.

fallbacks

जुलै 2021 मध्ये रेबेकाची 36 वर्षीय निकसोबत एंगेजमेंट झाली होती. ऑनलाइन भेटल्यानंतर 5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी हा निर्णय घेतला. दरम्यान जेव्हा रेबेकाला कळले की ती गरोदर आहे आणि 20 जून रोजी मुलाचा जन्म देणार आहे. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नाच्याच दिवशी रेबेकाने मुलाला जन्म दिला होता.  

लग्नाच्या काही तास आधी ती रद्द झाल्यामुळे या जोडप्याला सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान झाले असावे. मात्र, येत्या काळात ते लग्न करतील, अशी आशा या जोडप्याला आहे. 

Read More