अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील अशोक पांडे यांना 2021 मधील अवमान प्रकरणी सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वकिलाचा पोषाख न घालता, शर्टाचे बटण उघडे ठेवत ते न्यायालयात हजर झाले होते.
न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि बीआर सिंग यांच्या खंडपीठाने गुरुवारी म्हटलं की, आरोपांचं गांभीर्य, अशोक पांडे यांचं मागील वर्तन आणि कार्यवाहीत सहभागी होण्यास नकार दिल्याने योग्य शिक्षा देण्याची गरज आहे. खंडपीठाने 2 हजारांचा दंडही ठोठावला आहे. जर दंड भरला नाही तर कैदेत एका महिन्याची वाढ होईल.
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, वकील अशोक पांडे यांना लखनौच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. खंडपीठाने पांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, ज्यामध्ये त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालय आणि त्याच्या लखनौ खंडपीठात वकिली करण्यापासून का रोखले जाऊ नये अशी विचारणा करण्यात आली आहे. त्यांना 1 मे पर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे.
18 ऑगस्ट 2021 रोजी पांडे अयोग्य पोशाखात न्यायालयात हजर झाले आणि कथितपणे न्यायमूर्तींशी गैरवर्तन केलं. जेव्हा त्यांच्या उपस्थितीला आव्हान देण्यात आलं तेव्हा त्यांना आणि त्यांना निघून जाण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी गुंड असा उल्लेख केला. यानंतर त्यांच्यावर अवमान कारवाई सुरू करण्यात आली.