Amarnath Yatra 2025 : हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये काश्मिरच्या दक्षिणेकडे असणाऱ्या एका भव्य गुहेमध्ये नैसर्गिकरित्या साकारल्या जाणाऱ्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक अमरनाथ यात्रेस येतात. बाबा बर्फानी अर्थात अमरनाथ बाबांचं दर्शन घेत रहस्यमयीरित्या अवतरणाऱ्या दैवी रुपाला साक्षात पाहण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास केला जातो. यंदाच्या वर्षीसुद्धा या यात्रेसाठी प्रशासन सज्ज झालं असून त्यासाठीच्या काही महत्त्वाच्या तारखा जारी करण्यात आल्या आहेत.
अमरनाथ यात्रेसाठीच्या महत्त्वाच्या तारखा...
- यात्रा कधी सुरू होणार? - 3 जुलै 2025
- यात्रा समाप्ती कधी? - 9 ऑगस्ट 2025
- यात्रेच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेची सुरुवात- 14 एप्रिल 2025
अमरनाथ यात्रेसाठी येऊ इच्छिणाऱ्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं नावनोंदणी करणं गरजेचं असेल. त्यापैकी ऑनलाईन प्रक्रियेसाठीची खालील पायऱ्या गरजेच्या...
- Shri Amarnathji Shrine Board (SASB) च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- इथं Online Services वर क्लिक करा.
- पुढे Yatra Permit Registration हा पर्याय निवडा आणि नियमावली लक्षपूर्वक वाचा.
- ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक यात्रा परमिट जारी केलं जाईल, ज्याचा वापर तुम्ही भविष्या यात्रेदरम्यान करु शकता.
ऑफलाईन नोंदणीसाठी...
- अमरनाथ यात्रेच्या ऑफलाईन नोंदणीसाठी तुमच्या नजीकच्या पंजाब नॅशनल बँक, जम्मू काश्मीर बँक किंवा येस बँकेच्या शाखांना भेट द्या.
- इथं टोकन स्लीप घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- यासाठी तुम्हाला वैद्यकिय चाचणी करून RFID कार्ड घ्यावं लागेल.
यात्रेसाठीची आवश्यक कागदपत्र...
- पूर्णपणे भरलेला आणि स्वाक्षरी असणारा नोंदणी फॉर्म
- नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड, वोटर कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसन्स
- वैध डॉक्टरांकडून जारी केलेलं वैद्यकिय प्रमाणपत्र
- यात्रा परमिट (प्रत्यक्ष प्रत किंवा इलेक्ट्रॉनिक कॉपी)
लक्षात ठेवा....
13 ते 70 वयोगटातील कोणतीही व्यक्ती अमरनाथ यात्रेसाठी येऊ शकते. या यात्रेला येणाऱ्यांनी शारीरिक सुदृढतेसोबतच डोंगराळ भागांसमवेत कमी ऑक्सिजन असणाऱ्या भागांमध्ये प्रवासासाठीची तयारी दाखवावी. सहा आठवड्यांहून अधिक काळासाठी गर्भवती असणाऱ्या महिलांना यात्रेसाठी परवानगी नाही.