Marathi News> भारत
Advertisement

बापाची बुक्की ठरली जीवघेणी, 3 वर्षाच्या मुलीला मारून बापाने... थरारक घटना

अवघ्या 3 वर्षाच्या मुलीसोबत बाप सैतानासारखा वागला आहे

बापाची बुक्की ठरली जीवघेणी, 3 वर्षाच्या मुलीला मारून बापाने... थरारक घटना

Crime News : आपल्या पोटच्या मुलीसोबत एका बापाने धक्कादायक कृत्य केलं आहे. अवघ्या 3 वर्षाच्या मुलीसोबत बाप सैतानासारखा वागला. रात्री मुलगी रडली म्हणून बापाने तिच्या नाकावर बुक्की मारली यामध्ये मुलीचा जाग्यावरच मृत्यु झाला. त्यानंतर पोलिसात जाऊन अपहरण झाल्याची तक्रारही दिली. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा मोठ्या शिताफीने शोध घेत आरोपी बापाला अटक केली आहे. प्रमोद मांझी असं क्रूर बापाचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?
प्रमोद मांझी रात्री झोपले असताना त्याची मुलगी रडायला लागली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याला राग आला. त्याने तिच्या नाकावर जोरात बुक्की मारली. त्याने मारलेली बुक्की जीवघेणी ठरली, मुलीचा जाग्यावर मृत्यु झाला. पती-पत्नी दोघेही घाबरले. तुरुंगात जाण्याच्या भीतीने  प्रमोद मांझी आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन गेला आणि घुनघुट्टा नदीमध्ये फेकला.

पोलीस ठाण्यामध्ये जात मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार केली. आपल्या मुलीच्या अपहरणाची कहाणी केली.  पोलिसांनी गांभीर्याने तपास केला, मांझी यांच्या शेजारच्यांची पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांना प्रमोद आणि त्याच्या पत्नीवर संशय आला. 

पती-पत्नीच्या जबाबावरूनही पोलिसांना संशय आला. त्यानंतर कसून चौकशी केल्यावर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. बापाच्या क्षणभर रागाने पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील मेनपत इथली ही घटना आहे

 

Read More