Marathi News> भारत
Advertisement

रुग्णवाहिकेत 3 तरुण आणि एका तरुणीचा लज्जास्पद खेळ; नको त्या अवस्थेत आढळल्याने पोलिसांकडून अटक

वारणसीमध्ये कोरोना संकट काळात रुग्णवाहिकेत प्रणय क्रीडा करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

रुग्णवाहिकेत 3 तरुण आणि एका तरुणीचा लज्जास्पद खेळ; नको त्या अवस्थेत आढळल्याने पोलिसांकडून अटक

वाराणसी : उत्तरप्रदेशातील वारणसीमध्ये कोरोना संकट काळात रुग्णवाहिकेत प्रणय क्रीडा करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वाराणसीला लाज आणणारी घटना समोर आली आहे.  सध्या रुग्णवाहिकेला सील करण्यात आले आहे. घटनेत सहभागी असलेल्या तरुण तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुजाबाद चौकीसमोर बराच वेळेपासून उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला अधून मधून डोलताना पाहिले होते. परंतु रुग्णवाहिका बराच वेळ तिथेच होती. त्यामुळे रुग्णाचे काही बरे वाईट तर नसेल झाले या शंकने लोकांनी आंत डोकावून पाहिले तर त्यांना धक्काच बसला.

रुग्णवाहिका सील

स्थानिक लोकांनी रुग्णवाहिकेत डोकावून पाहिल्यानंतर 3 तरुण आणि एका तरुणीला नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी रुग्णवाहिकेत क्रीडा करणाऱ्या चारही जणांना ताब्यात घेतलं.  तसेच त्या रुग्णवाहिकेलाही सील करण्यात आले आहे.

संबधित रुग्णवाहिका वाराणसीच्या मंडुवाडीह परिसरातील खासगी रुग्णालयाची होती. एका व्यक्तीने ती भाड्याने चालवायला घेतली होती. अशी माहिती मिळत आहे.

Read More