Marathi News> भारत
Advertisement

महाराष्ट्रासहीत भारतातील 'या' राज्यांमध्ये जाताना...; अमेरिकेचा आपल्या नागरिकांना इशारा

US travel advisory for India: अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारतातील प्रवासाबाबत आपल्या नागरिकांसाठी एक नवीन ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे आणि त्यात सावधगिरीची सूचना देण्यात आली आहे. 

महाराष्ट्रासहीत भारतातील 'या' राज्यांमध्ये जाताना...; अमेरिकेचा आपल्या नागरिकांना इशारा

US sounds alarm on travel to India: अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने रविवारी एक नवीन सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये परदेशात राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या अमेरिकन नागरिकांना अधिक सतर्क राहण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या  आपल्या नागरिकांसाठी एक नवीन ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. भारतातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर ही अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. या अ‍ॅडव्हायजरीमध्ये बलात्कार आणि हिंसक गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नमूद करत, विशेषतः उत्तर प्रदेशसह काही राज्यांतील प्रवास टाळण्याची सूचना करण्यात आली आहे.

अ‍ॅडव्हायजरीमध्ये काय सांगितलं आहे?

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या अ‍ॅडव्हायजरीत भारतातील गुन्हेगारी आणि दहशतवादी हल्ल्यांचा धोका अधोरेखित करण्यात आला आहे. यात म्हटलं आहे की, 'भारतात बलात्कार हे वेगाने वाढणारे गुन्हे आहेत आणि पर्यटक स्थळांवरही हिंसक प्रकार वाढले आहेत. दहशतवादी हल्ले कोणत्याही क्षणी होऊ शकतात, आणि अशा वेळी बाजारपेठा, मॉल्स, ट्रान्सपोर्ट हब्स यांसारखी ठिकाणं विशेषतः लक्ष्य बनू शकतात.' त्यामुळे सतर्कता बाळगणे महत्त्वाचे आहे. 

हे ही वाचा: इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री! इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर केला हल्ला

 

'या' राज्यांमध्ये प्रवास न करण्याचा इशारा

अ‍ॅडव्हायजरीनुसार छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील ग्रामीण भागांमध्ये नक्षलवादी हालचालींमुळे प्रवास टाळावा, असं अमेरिकेने स्पष्टपणे म्हटलं आहे. तसेच मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्षामुळे त्या भागातही प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू-कश्मीरमध्ये (लेह आणि पूर्व लडाख वगळता) देखील सावधगिरी बाळगण्याचं निर्देश दिले गेले आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष परवानगी अनिवार्य

अ‍ॅडव्हायजरीत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे की, भारतात कार्यरत अमेरिकी सरकारी कर्मचाऱ्यांना झारखंड, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात प्रवास करण्यासाठी आधीच परवानगी घ्यावी लागेल. मणिपूरमध्येही प्रवास करण्यासाठी आधी मंजुरी घेणं अनिवार्य आहे.

ही अ‍ॅडव्हायजरी 16 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, ग्रामीण भागांमध्ये अमेरिकन नागरिकांसाठी मदत मर्यादित असते, त्यामुळे प्रवासापूर्वी योग्य तयारी ठेवण्याचंही आवाहन केलं आहे. 

Read More