Marathi News> भारत
Advertisement

FBI राम रहिमकडून जप्त केलेल्या हार्ट डिस्कची चौकशी

  सिसरा येथील राम रहिम यांच्या डेरा सच्चा सौदा येथून जप्त केलेल्या पण नासधूस केलेल्या डार्ट डिस्कची तपासणी आता अमेरिकेची चौकशी संस्था फेड्रेल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (FBI)करणार आहेत. 

FBI राम रहिमकडून जप्त केलेल्या हार्ट डिस्कची चौकशी

नवी दिल्ली :  सिसरा येथील राम रहिम यांच्या डेरा सच्चा सौदा येथून जप्त केलेल्या पण नासधूस केलेल्या डार्ट डिस्कची तपासणी आता अमेरिकेची चौकशी संस्था फेड्रेल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (FBI)करणार आहेत. 

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम याला अटक केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकण्यापूर्वी हार्ट डिस्क जाळू टाकल्या होत्या. सुमारे ७०० एकरमध्ये हा डेरा पसरला आहे. 

डेऱ्यातून  ३ हार्ट डिस्क अर्ध जळालेल्या अवस्थेत पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. तसेच पोलीस या प्रकरणी केंद्रीय फॉरेंसिक सायन्स लॅब्रोटरीची मदत घेणार आहे. तसेच विविध संस्थाच्या माध्यमातून या डार्ट डिस्कचे तुटलेले दुवे जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

संबंधित स्टोअरेज डिव्हाइस हे डेऱ्यातील मुलीच्या वसतीगृहाजवळ सापडल्या. या हार्ट डिस्कच्या मदतीने डेरा प्रमुख आणि त्यांच्या साथीदारांचे गुन्हे उजेडात येण्यात मदत मिळणार आहे. 

रेप केसमध्ये दोषी राम रहिम याला २० वर्षांच्या शिक्षा सुनावली गेली आहे. 

Read More