Marathi News> भारत
Advertisement

अमित शाह यांच्याकडून नातीने भाजपची टोपी नाकारली...

अमित शाह यांनी नातीची टोपी काढत भाजपची प्रचार टोपी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने भाजपची टोपी काढून टाकली.

अमित शाह यांच्याकडून नातीने भाजपची टोपी नाकारली...

गांधीनगर : एकिकडे विरोधी पक्षातील नेते मोठ्या अभिमानाने भाजपचा गमछा घालत, भाजपला आपलेस करत पक्षात प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे मात्र आज भाजपची टोपी नाकारली ती खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नातीने. गांधीनगरमधून  उमेदवारी अर्ज भरण्याआधी अमित शाह जेव्हा जाहीर सभेसाठी आले तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचं कुटुंबही हजर होते. यावेळी आपल्या आजोबांच्या प्रचारात त्यांची चिमुकली नातही हजर होती. ऊन असल्याकारणाने छान पांढरी फुलाची टोपी घालून ती आली होती. 

अमित शाह यांनी तिची टोपी काढत तिला भाजपची प्रचार टोपी घालण्याचा एकदा नाही दोनदा प्रयत्न केला. मात्र नातीला ते काही मान्य नव्हते. भाजपची टोपी बाजुला करत. अखेर तिने आपली आवडती टोपी घातल्यावरच तिचे समाधान झाले आणि तिच्या चेहऱ्यावरही हसू आले. हे सार कॅमेरात चित्रीत झाल्याने आणि नातीनेच भाजप पक्षाची टोपी नाकारल्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आले.

राष्ट्रवादीकडून भाजपला टोला लगावण्यात आला आहे. 'बच्चे मन के सच्चे' असे म्हणत अमित शाह यांचा व्हिडिओ अपलोड केला आहे.

Read More