Marathi News> भारत
Advertisement

सरसंघचालक आणि अमित शहा यांच्यात साडेचार तास बैठक

तब्बल साडेचार तास ही बैठक चालली. तत्पूर्वी सकाळी विश्व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचीत आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे हे संघमुख्यालयात पोहचले. 

सरसंघचालक आणि अमित शहा यांच्यात साडेचार तास बैठक

नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज नागपुरात संघमुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली.  तब्बल साडेचार तास ही बैठक चालली. तत्पूर्वी सकाळी विश्व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचीत आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे हे संघमुख्यालयात पोहचले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. कोकजेंपाठोपाठ अमित शहा संघमुख्यालयात पोहचले. महत्वाचे म्हणजे अमित शहा संघ मुख्यालयात पोहचले तेव्हा केंद्रीय उमा भारतीही तिथे उपस्थित होत्या. प्रवीण तोगडीयांनी मोदींविरोधात घेतलेला आक्रमक पवित्रा आणि कर्नाटक तसंच मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर  ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

Read More