Marathi News> भारत
Advertisement

बाळासाहेबांनी कधीही आपल्या आदर्शांसोबत तडजोड केली नाही - अमित शाह

गृहमंत्री अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.

बाळासाहेबांनी कधीही आपल्या आदर्शांसोबत तडजोड केली नाही - अमित शाह

मुंबई : 'बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या काळातले बुद्धीजीवी होते. त्यांच्या भाषणांनी नेहमीच जनतेला प्रभावित केलं. त्यांनी कधीही आपल्या आदर्शांसोबत तडजोड केली नाही. बाळासाहेबांचं जीवन आणि मूल्य नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत.' अशा शब्दात गृहमंत्री अमित शाहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.

आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी अनेक मंत्री आणि नेते येत आहेत.

महाराष्‍ट्रात भाजपची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी करत शिवसेनेने सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर शिवसेना आणि भाजपमधीलव संबंध आणखी ताणले गेले आहेत. भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडीचा नवा फॉर्म्युला राज्यात आणला. त्यानंतर ते मुख्‍यमंत्री झाले. पण शिवसेनेवर विचारधारेवरुन सतत टीका होत आहे. भाजप आणि शिवसेना अनेक वर्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र लढले. पण आता दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक झाले आहेत. 

Read More