Marathi News> भारत
Advertisement

इंदिरा गांधींमुळे POK पाकिस्तानकडे, अक्साई चीन नेहरुंमुळे..; संसदेत शाहांचे आक्रमक भाषण

Amit Shah Slams Opposition In Parliament: अमित शाह यांनी अनेक जुने संदर्भ वापरत आम्हाला काय प्रश्न विचारता असा उलट सवाल काँग्रेस आणि विरोधकांना केला.

इंदिरा गांधींमुळे POK पाकिस्तानकडे, अक्साई चीन नेहरुंमुळे..; संसदेत शाहांचे आक्रमक भाषण

Amit Shah Slams Opposition In Parliament: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूर, पहलगामनंतर पाकिस्तानबरोबर झालेला संघर्ष यावरुन भाष्य करताना काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसवर टीका करताना शाहांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधींचे निर्णय चुकले असा आरोप करत काँग्रेसला लक्ष्य केलं. 

नेहरु आणि इंदिरा गांधींवर साधला निशाणा

अमित शहा यांनी पंडित नेहरुंच्या निर्णयांवरुन टीका केली. "सरदार पटेलांच्या विरोधाला न जुमानता पंडित नेहरूंनी संयुक्त राष्ट्रांमध्ये जाऊन सिंधू कराराचा उल्लेख केला. इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले असे म्हटले. हा एक मोठा विजय होता आणि आपण सर्वांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे, पण युद्धानंतर काय घडले? शिमला येथे एक करार झाला, पण त्या करारामध्ये ते पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मागायला विसरले. जर आपण त्यावेळी पीओके मागितले असते तर ना रहता बांस न बजती बांसुरी, अशी स्थिती असती. ते पीओके मागायला विसरले आणि बळकावलेली 15 हजार चौरस किलोमीटर जमीनही दिली," असा टोला शाहांनी लगावला.

'अरे भाऊ, तू पाकिस्तानला...'

गृहमंत्र्यांनी सांगितले की, 195 पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर युद्ध गुन्ह्यांचा खटला चालवायचा होता पण भुट्टो यांनी इंदिराजींच्या माध्यमातून त्यांची सुटका करून घेतली. याचसंदर्भातून पुढे अमित शाहांनी माजी लष्कर प्रमुख जनरल माणेकशॉ यांचा संदर्भ दिला. "सदर निर्णयाबद्दल माणेकशॉ म्हणाले की, भुट्टो यांनी भारतीय नेतृत्वाला मूर्ख बनवले होते," असं अमित शाह म्हणाले. "आज ते (काँग्रेसवाले) आपल्याला शिकवत आहेत की हे झाले नाही, ते झाले नाही. अरे भाऊ, तू पाकिस्तानला क्लीन चिट देत आहेस, तुला विचारण्याचा अधिकार नाही," असा टोला शाहांनी लगावला.

नक्की वाचा >> 2 महिने रेकी, पहाटे 4.46 वाजता...; पहलगामच्या दहशतवाद्यांना कसं संपवलं? शाहांनी सांगितला घटनाक्रम

"कनिमोझीजी म्हणत आहेत की आम्ही हे दिले नाही, ते दिले नाही. ज्या लोकांसोबत तुम्ही बसला आहात त्यांचा गुन्हा तुमच्यावर येईल," असं शाह म्हणाले. "दहशतवादावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. ते म्हणाले की, 1971 नंतर आम्ही पीओकेची मागणी करणे बंद केले होते. 1962 च्या युद्धात काय घडले? कालच काही काँग्रेस सदस्य चीनबद्दल प्रश्न विचारत होते," असं शाह यांनी म्हटलं. 

अक्साई चीनचा भाग नेहरुंनी चीनला दिला

"आज मी विचारू इच्छितो की, 62 च्या युद्धात काय झाले. अक्साई चीनचा 30 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग चीनला देण्यात आला होता. त्यावर नेहरूजींनी सभागृहात सांगितले की तिथे गवताचा एक पाताही उगवत नाही, तुम्ही त्या जागेचे काय कराल. त्याचे डोके माझ्यासारखे होते. एका सदस्याने म्हटले की तुमच्या डोक्यावर एकही केस नाही, आपण ते चीनला पाठवावे का?" असा खोचक टोला शाहांनी लगावला.

Read More