Marathi News> भारत
Advertisement

देशभरात लॉकडाऊन : जीवनावश्यक वस्तूंसंदर्भात गृहमंत्र्यांचे महत्वाचे ट्वीट

लॉकडाऊनच्या काळात या वस्तू कमी पडणार नाहीत याचे मी आश्वासन देतो

देशभरात लॉकडाऊन : जीवनावश्यक वस्तूंसंदर्भात गृहमंत्र्यांचे महत्वाचे ट्वीट

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. हा एकप्रकारचा कर्फ्यू असून जनता कर्फ्यूपेक्षा जास्त कडक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आपलं, आपल्या परवाराचे आयुष्य वाचवणं ही माझी, भारत सकारची, प्रत्येक राज्य सरकारची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातील महत्वाचे ट्वीट केले आहे. 

देशामध्ये जीवनावश्य वस्तूंची कमी पडणार नाही असे आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. लॉकडाऊनच्या काळात या वस्तू कमी पडणार नाहीत याचे मी आश्वासन देतो असे ते ट्वीटमध्ये म्हणाले.

केंद्र सरकार सर्व राज्य सरकारसोबत मिळून सर्व प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

कोणालाही घाबरुन जाण्याची गरज नाही. कोरोनाविरुद्धच्या या युद्धात संपूर्ण देश एकत्र असल्याचे ते म्हणाले. 

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांच्या  लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधानांनी केली. हा २१ दिवसांचा कालावधी भारतासाठी निर्णायक असेल.

या काळात आपण कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरलो तर देश उद्ध्वस्त होईल. आपण २१ वर्ष मागे फेकले जाऊ, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
 
गेल्या काही दिवसांपासून राज्य पातळीवर लॉकडाऊन करूनही नागरिक परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्यायला तयार नाहीत.

अनेकजण बाजारपेठा आणि रस्त्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे आता मोदींच्या सांगण्याने तरी या परिस्थितीत काही फरक पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  
 

Read More