Marathi News> भारत
Advertisement

अमृतसर दुर्घटना : ड्रायव्हरचं पत्र आलं समोर, त्या रात्रीची पूर्ण कहाणी

या पत्रात ड्रायव्हरने त्या रात्री घडलेली संपूर्ण घटना सांगितली.

अमृतसर दुर्घटना : ड्रायव्हरचं पत्र आलं समोर, त्या रात्रीची पूर्ण कहाणी

नवी दिल्ली : दसऱ्याच्या दिवशी अमृतसरमध्ये रेल्वे खाली चिरडून 60 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पंजाब आणि रेल्वे पोलिसांनी शनिवारी रेल्वे चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आता याप्रकरणी ड्रायव्हरचं लिहिलेलं पत्र समोर आलंय. या पत्रात ड्रायव्हरने त्या रात्री घडलेली संपूर्ण घटना सांगितली. अरविंद कुमार असं या ड्रायव्हरचं नाव आहे. 

'जसं मी पाहीलं की ट्रॅकवर शेकडो जण आहेत, मी एमरजंसी ब्रेक लावले. दरम्यान मी मोठमोठ्याने हॉर्न वाजवला. असं असतानाही अनेकजण ट्रेन खाली आले. मी ट्रेन थांबवली पण लोकांनी दगडफेक करायला सुरूवात केली. ट्रेनमधील प्रवाशांची सुरक्षा पाहता मी ट्रेन पुढे नेली' अस अरविंदने सांगितलं.

नेमकं काय घडलं ?

'मी 19 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5 वाजता चार्ज घेतला. जालंधरहून निघून मी संध्याकाळी 6.44 वाजता मानांवाला पोहोचलो. 6.46 वाजता येलो सिग्नल आणि ग्रीन सिग्लन मिळाल्यानंतर ट्रेन अमृतसरसाठी निघाली.

मानांवाला आणि अमृतसरच्या गेट सं.28 चे अंतर आणि गेटवरील ग्रीन सिग्नल पार केला.

जसं गाडी केएम नं-508/11 च्या जवळ पोहोचली तेव्हा समोरुन गाडी नं.13006 डीएन येत होती. अचानक लोकांची गर्दी ट्रॅकवर दिसू लागली. मी हॉर्न वाजवायला सुरूवात केली.

एमरजंन्सी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला.

गाडीचा स्पीड कमी करण्याचा प्रयत्न केला पण मोठ्या संख्येने लोकांनी माझ्या गाडीवर दगडफेक करायला सुरूवात केली.' अशी कहाणी त्यांनी सांगितली. 

या घटनेनंतर आयोजकांविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई झाली नाहीयं. आयोजक भूमीगत झाल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. रेल्वे अधिकारी यासंदर्भात अधिक माहिती गोळा करत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा शुक्रवारी रात्री घटनास्थळी धाव घेतली होती. 

Read More