Marathi News> भारत
Advertisement

अमूलकडून अभिनंदन यांचे अनोखे स्वागत

अभिनंदन भारतात परतल्यानंतर देशभरातून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

अमूलकडून अभिनंदन यांचे अनोखे स्वागत

मुंबई : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान यांची पाकिस्तानकडून सुटका करण्यात आल्यानंतर देशाभरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. भारताच्या या शूरवीराच्या सुटकेने देशभरात आनंदाची भावना व्यक्त केली जात आहे. अभिनंदन भारतात परतल्यानंतर अमूलनेही त्यांचे खास शैलीत स्वागत केले आहे. अमूलने अतिशय सुरेख कार्टून काढत अभिनंदन यांच्या परतण्याचा आनंद व्यक्त केला आहे. अमूल गर्ल हातात गोड पदार्थाचा डब्बा तसेच फुलांच्या माळा घेऊन त्यांचे स्वागत करताना दिसत आहे. 'आ भी जाओ हमारे पास' असे म्हणत अमूलने अभिनंदन यांचे स्वागत केले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला. त्यावेळी देखील अमूलकडून भारतीय हवाई दलाने केलेल्या कामगिरीबद्दल जवानांचे अभिनंदन करत त्यांना सलाम केला होता. अमूलकडून काढण्यात या आलेल्या कार्टूनमध्ये अमूल गर्ल भारतीय जवानांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीबद्दल त्यांना सलाम करताना दिसत आहे.

१४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने जम्मू-काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानकडून विमानांच्या सहाय्याने हल्ला चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ लढावू विमान जमीनदोस्त केले. परंतु यावेळी अभिनंदन यांचे मिग-२१ विमान पाकिस्तानच्या हद्दीत पोहचले होते. त्यानंतर तब्बल ६० तासांनंतर अभिनंदन यांना भारतात परत पाठवण्यात आले. 

Read More