Marathi News> भारत
Advertisement

2019 मध्ये महिलेची हत्या; जामीन मिळताच बाहेर येऊन तिचा पती आणि आईला केलं ठार; कारण विचारलं तर म्हणतो 'मला फक्त...'

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चेन्थामाराने दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली आहे. आरोपीने म्हटलं आहे की सुधाकरन त्याच्या पत्नीचा बदला घेण्यासाठी त्याच्यावर हल्ला करेल अशी भिती होती.   

2019 मध्ये महिलेची हत्या; जामीन मिळताच बाहेर येऊन तिचा पती आणि आईला केलं ठार; कारण विचारलं तर म्हणतो 'मला फक्त...'

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील नेनमारा शहरात दुहेरी हत्याकांडानंतर खळबळ उडाली आहे. स्थानिक रहिवासी सुधाकरन (55) आणि त्याची आई लक्ष्मी (75) यांची सोमवारी त्यांच्या घरीच निर्घृणपणे चाकूने वार करून हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे आरोपी त्यांचा शेजारी चेंथामारा आहे, जो पाच वर्षांपूर्वी सुधाकरनची पत्नी साजिथाच्या खून प्रकरणात जामिनावर बाहेर होता. पोलिसांनी 36 तासांच्या शोधानंतर चेंथामाराला अटक केली आहे. या दुहेरी हत्याकांडनंतर लोक संतापले असून, पोलीस ठाण्याच्या बाहेर निदर्शनं केली आहेत. पोलिसांना त्यांना रोखण्यासाठी सौम्य बळाचा वापर करावा लागला.

पाच वर्षांच्या आतच भयानक हत्याकांडात आपल्या आई-वडिलांना गमावल्यामुळे सुधाकरनच्या मुली अखिला आणि अथुल्या यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 2019 मध्ये, चेंथमाराने त्यांची आई साजिथाची हत्या केल्याचा आरोप आहे. काही वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर, तो जामिनावर बाहेर आला आणि नेनमारा येथील त्याच्या घरी परतला. स्थानिक रहिवासी आणि सुधाकरनच्या मुलींनी आरोप केला आहे की, त्यांनी पोलिसांना चेंथमारला परिसरातून काढून टाकण्यास सांगितल होतं परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सोमवारी, 58 वर्षीय सुधाकरनने त्यांच्या घरात सुधाकरन आणि त्याच्या आईवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे.

अखिला आणि अथुल्या यांनी चेंथमाराला फाशी देण्याची मागणी केली आहे. "त्याने 2019 मध्ये आमच्या आईची हत्या केली आणि तो तुरुंगात होता. नंतर तो बाहेर आला आणि आमच्या वडिलांना आणि आजीला मारले. त्याला आता अटक करण्यात आली आहे. त्याला तुरुंगात टाकले जाईल, काही वर्षांनी सोडलं जाईल आणि पुन्हा तो लोकांना मारेल," असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे, "त्याने आमच्या वडिलांसोबत असे का केले? त्याने आमच्या वडिलांना कसे मारले ते पहा," असंही त्या म्हणाल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंथमाराने डबल मर्डर केल्याची कबुली दिली आहे. आरोपीने म्हटलं की, पत्नीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सुधाकरन आपल्यावर हल्ला करेल अशी भिती होती. यामुळेच मी त्याला आणि त्याच्या आईला ठार केलं. अनेक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, चेंथमाराला त्याची पत्नी सुधाकरनच्या कुटुंबाने केलेल्या जादूटोण्यामुळे त्याला सोडून गेली असा संशय होता. याच द्वेषामुळे त्याने 2019 मध्ये सहिताची हत्या केल्याचा आरोप आहे. तिच्या मृत्यूनंतर सुधाकरनने पुन्हा लग्न केले. त्याची दुसरी पत्नी आणि मुली वाचल्या कारण चेंथमाराने हल्ला केला तेव्हा त्या घरी नव्हत्या. त्याने पोलिसांना असंही सांगितले आहे की, त्याने त्याच्या विभक्त झालेल्या पत्नीचीही हत्या करण्याचा विचार केला होता. पोलिसांनी म्हटले आहे की हा दुहेरी खून पूर्वनियोजित होता आणि चेंथमाराने त्यासाठी खास शस्त्र खरेदी केलं होतं

अटक कशी केली?

हत्या केल्यानंतर चेंथमारा जंगलात जाऊन लपला होता. पोलिसांना त्याला अटक करण्यासाठी 36 पेक्षा जास्त तास लागले. पोलिसांनी सांगितलं आहे की, त्याला जंगल परिसर चांगला माहिती होती आणि पोलिसांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून होता. अखेर पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला. पोलिसांनी आपण शोध थांबवत असल्याचं जाहीर केलं. चेंथमाराने हे ऐकलं आणि पुन्हा लपण्याआधी घरा जाऊन खाण्याचं सामान आणायचं ठरवलं. पण परतत असताना रस्त्यात पोलीस त्याची वाट पाहत थांबले होते. त्याला रात्री 10.30 वाजता अटक करण्यात आली. 

अटकेची बातमी कळताच पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. 

Read More