Marathi News> भारत
Advertisement

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा झटका, नागरिक घाबरुन घराबाहेर पळाले; भीतीचं वातावरण

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा भूकंप 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.   

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा झटका, नागरिक घाबरुन घराबाहेर पळाले; भीतीचं वातावरण

भूकंपाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असणारा उत्तराखंडचा उत्तरकाशी जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. सोमवारी सकाळी जवळपास 8 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. या भूकंपात कोणतंही नुकसान झालं असल्याची माहिती समोर आलेली नाही. पण भूकंपामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरुन घराबाहेर आले होते. भूकंपाचं केंद्र हिमालच प्रदेशला लागून असणाऱ्या मोरी ब्लॉकच्या कोठीगाड क्षेत्रात जमिनीच्या पाच किमी खाली होतं. 

फक्त याच वर्षाबद्दल बोलायचं गेल्यास उत्तरकाशीमध्ये अनेक वेळा भूकंप आला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपामुळे नागरिकांमध्ये दहशतवीचं वातावरण आहे. अशा स्थितीत भूकंपाचा छोटासाही धक्का जाणवला तरी लोक घाबरत आहेत. 

याआधी 7 एप्रिल 2023 मध्ये 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. भूकंपाचं केंद्र जिल्हा मुख्यालयाच्या जवळ मांडो गावातील जंगलात असल्याचं सांगण्यात आलं होतं. उत्तराखंडमधील उत्तरकाशी, पिथौरागड, चमोली आणि बागेश्वर जिल्हा भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. उत्तराखंडे झोन पाचमध्ये येतं. 

1991 मध्ये भूकंपात 768 लोकांचा झाला होता मृत्यू

गढवालमधील उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग जिल्हा आणि कुमाऊंचं कपकोट, धारचूला, मुनस्यारी क्षेत्र भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. यामधील उत्तरकाशी सर्वाधिक संवेदनशील ठिकाण आहे. उत्तरकाशी भूगोलीय दृष्टीकोनातून अती संवेदनशील झोन 4 आणि 5 मध्ये येतं. 

उत्तरकाशीत 1991 मध्ये आलेल्या भूकंपाने हाहाकार माजवला होता. 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपात 768 लोकांचा मृत्यू झाला होता. तसंच 1800 लोक अत्यंत गंभीर जखमी झाले होते. या भूकंपाने 3 हजार कुटुंबांना बेघर केलं होतं. 

Read More