Marathi News> भारत
Advertisement

Anand Mahindra यांनी हात सोडून सायकल चालवणाऱ्याचा व्हिडीओ केला ट्वीट, म्हटले 'जबरदस्त बॅलेन्स'

महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलेला एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपले दोन्ही हात सोडून सायकल चालवत आहे.

Anand Mahindra यांनी हात सोडून सायकल चालवणाऱ्याचा व्हिडीओ केला ट्वीट, म्हटले 'जबरदस्त बॅलेन्स'

मुंबई : आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये गावातील एक व्यक्ती डोक्यावर चाऱ्याचा गठ्ठा घेऊन सायकल चालवत आहे. विशेष म्हणजे ही व्यक्तीने सायकलचे हँडल सोडून दोन्ही हाताने चाऱ्याचा गठ्ठा पकडला आहे.

गावकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

भारतीयांच्या वेगवेगळ्या विशेष कौशल्यांचं आनंद महिंद्रा नेहमीच कौतुक करीत असतात. यावेळी त्यांनी दोन्ही हात सोडून सायकल चालवणाऱ्या गावकऱ्यााच व्हिडीओ शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांना या व्हिडीओने भुरळ पाडली आहे.

आनंद महिंद्रा यांनी केलं कौतुक

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून हा माणूस Human Segway असल्याचे म्हटले आहे. त्याच्या शरीरात आधीपासून Gyroscope (एक प्रकारचा सेन्सर) बसवलेला आहे.  त्यांनी पुढे लिहिले की, मला वाईट वाटते की अशा अनेक प्रतिभावान लोक जे जिम्नॅस्ट किंवा खेळाडू बनू शकतात त्यांना ओळखले जात नाही किंवा प्रशिक्षित केले जात नाही.

व्हायरल झालेले ट्वीट

महिंद्राचे ट्विट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेक युजर्सनी आनंद महिंद्रा यांच्या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. ग्रामीण भागातील टँलेंट पुढे यावे यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करण्याची गरज देखील त्यांनी नेटकऱ्यांनी व्यक्त केली.

 

Read More