Marathi News> भारत
Advertisement

Operation Sindoor वर आनंद महिंद्रांची पोस्ट व्हायरल, प्रत्येक भारतीयाच्या मनातील भावना केली व्यक्त

Operation Sindoor Anand Mahindra Post:  ऑपरेशन सिंदूरनंतर आनंद महिंद्रा यांनी भारतीय सैन्याचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. जी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Operation Sindoor वर आनंद महिंद्रांची पोस्ट व्हायरल, प्रत्येक भारतीयाच्या मनातील भावना केली व्यक्त

7 मे च्या रात्री 1.30 च्या सुमारास, भारताने पाकिस्तानमध्ये 9 दहशतवादी तळ शोधले आणि त्यांच्यावर हवाई हल्ला केला. त्यामुळे दहशतवादाचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानला धक्का बसला. पण या कारवाईनंतर भारतात आनंदाचे वातावरण आहे, कारण भारताने अखेर पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेतला आहे, ज्यांना दहशतवाद्यांनी निर्घृणपणे मारले होते.

या कृतीमुळे भारतात निश्चितच आनंदाची लाट आहे. तसेच, भारतीय व्यापारी देखील भारतीय सैन्याचे कौतुक करताना दिसतात. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही भारताच्या कारवाईचे कौतुक केले आहे आणि 'ऑपरेशन सिंदूर'चा फोटो पोस्ट करताना त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

आम्ही सैन्यासोबत...

आनंद महिंद्रा यांनी भारतीय सैन्याच्या ऑपरेशनच्या नावाचा एक फोटो X वर पोस्ट केला आहे. ज्यावर ऑपरेशन सिंदूर लिहिले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये महिंद्रा यांनी लिहिले आहे की, 'आमच्या प्रार्थना आमच्या सैन्यासोबत आहेत... एक राष्ट्र म्हणून आम्ही सर्व एकत्र उभे आहोत.'

त्यांच्या पोस्टला इंटरनेट युझर्सकडूनही भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. लोक कमेंट सेक्शनमध्ये 'भारत माता की जय' आणि 'जय हिंद' लिहिताना दिसत आहेत. आतापर्यंत या पोस्टला 15 लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर 1 लाख 21 हजार युजर्सनी महिंद्राच्या या पोस्टला लाईकही केले आहे. पोस्टवर 1 हजाराहून अधिक कमेंट्सही आल्या आहेत.

ही पोस्ट 15 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे, तर 1 लाख 30 हजार लोकांनी लाईक केली आहे. त्याच वेळी, एक हजाराहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर, युझर्स खूप उत्साहित दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

एका युझर्सने लिहिले, खेळ आता सुरू झाला आहे. आपल्या सशस्त्र दलांना शक्ती आणि धैर्य. दुसऱ्या एका युझरने म्हटले की, आमच्या बहिणींच्या कपाळावरील सिंदूर नष्ट केल्यानंतर, तुम्ही आम्हाला हे मोदींना सांगण्यास सांगितले, त्यांनी #OperationSindoor द्वारे बदला घेतला आहे. दुसऱ्या एका वापरकर्त्याने कमेंट केली, आमचे सैन्य नेहमीच लक्ष्य अचूकपणे गाठते.

Read More