Marathi News> भारत
Advertisement

18 वर्षांच्या मुलीने केला 3 मुलींशी विवाह

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांसोबतच पोलीसही आश्चर्यचकीत झाले आहेत. घटना आहे एका मुलीसंबंधी. जी केवळ 18 वर्षांची असून, तिने चक्क 3 मुलींसोबत विवाह केला आहे.

18 वर्षांच्या मुलीने केला 3 मुलींशी विवाह

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे एक खळबळजनक घटना पुढे आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांसोबतच पोलीसही आश्चर्यचकीत झाले आहेत. घटना आहे एका मुलीसंबंधी. जी केवळ 18 वर्षांची असून, तिने चक्क 3 मुलींसोबत विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सर्वांची नजर चुकवून गुपचूप केले लग्न

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुलीचे नाव रामादेवी असे आहे. तसेच, ती पुलिवेंदुला येथील कासीनयन परिसरातील एका गावातील कॉटन मिलमध्ये काम करते. रामादेवीचे मोनिका नावाच्या मुलीशी दोस्ती होती. दोघी एकत्रच काम करत होत्या. दरम्यान, त्यांच्यातली मैत्री प्रेमात परावर्तीत झाली. इतकी की दोघींनी लग्नच करण्याचा निर्णय घेतला. सर्वांची नजर चुकवून दोघी पुलिवेंदुला येथे गुपचूप बोहल्यावरही चढल्या. काही कालावधीनंतर मोनिता ख्रिसमस निमित्त आपल्या घरी आली. तेव्हा हा प्रकार पुढे आला.

'ती'च्याशिाय 'ती' राहू शकत नाही

पोलिसांनी पुढे सांगितले की, मोनिकाच्या आईवडीलांनीही सांगितले की, रामादेवीचा तिच्यावर प्रचंड प्रभाव असून, दिवसभर ती तिचेच गुणगाण गात असते. आपल्या घरी तिला बोलविण्यासाठीही ती नेहमीच उत्साही असते. मोनिकाचे मन राखायचे म्हणून कुटुंबियांनी रामादेवीला घरी बोलावले. पण, दोघींनी लग्न केल्याचे सांगताच घरातले लोकही अवाक् झाले. मोनिकाने सांगितले की, ती रामादेवीशिवाय राहू शकत नाही. मोनिकाच्या आईवडीलांनी दोघींना खूप समजावले पण, कोणताही तोडगा निघू शकला नाही. पुढे पुढे तर रामादेवी आणि मोनिकाने घरच्यांचे बोलनेच ऐकायला नकार द्यायला सुरूवात केल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

धक्क्यामागून आणखी एक धक्का

रामादेवी आणि मोनिका सांगूनही ऐकत नाहीत. हे पाहिल्यावर कुटुंबियांनी थेट पोलिसांत तक्रार दिली. तर, आणखी एक धक्कादयाक माहिती पुढे आली. कुटुंबियांनी जम्मलमडुगू पोलीस स्थानकात तक्रार दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार पुढे आला. ज्यामुळे कुटुंबिय आणि पोलिसही अवाक झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिकाशी लग्न करण्यापूर्वी रामादेवीने आणखी दोन मुलींशी लग्न केले होते. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सखोल केला असता, रामादेविने बुज्जी, वंदना आणि मनिका अशा तिन मुलींशी लग्न केल्याचे समोर आले. सर्व मुलींशी संवाद साधून प्रकरणावर तोडगा काढण्याचे काम सध्या सुरू आहे.

Read More