Marathi News> भारत
Advertisement

अनिल अंबानीची ही कंपनी कर्जात बुडलीय, पण २०२१ मध्ये शेअर्स झाले डबल

2021 मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले

अनिल अंबानीची ही कंपनी कर्जात बुडलीय, पण २०२१ मध्ये शेअर्स झाले डबल

मुंबई : सध्या अनिल अंबानी कर्जाच्या बोझ्याखाली अडकले गेले आहेत. असे असले तरी त्यांनी याची झळ त्यांच्या कंपनीच्या गुंतवणूकदारांना होऊ दिली नाही. एवढेच काय तर त्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांचा फायदाच करुन दिला आहे.

अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या गुंतवणूकदारांना त्यांनाी श्रीमंत केले आहे. गेल्या 6 महिन्यांत रिलायन्स इन्फ्राच्या शेयरने त्यांच्या गुंतवणुकदारांना 200 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहे. गेल्या 12 महिन्यांत हा शेयर 265 टक्क्यांनी वाढला आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालक मंडळाने शेयर जारी करुन 550.56 कोटी रुपये भांडवल जमा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भांडवलाचा उपयोग कंपनीच्या सर्वसाधारण उद्दीष्टांसाठी दीर्घकालीन संसाधनांचा स्रोत म्हणून केला जाईल. भविष्यातील व्यवसाय वाढीच्या योजनांसाठी आणि कर्ज परतफेड करण्यासाठी या भांडवलाचा वापर केला जाईल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

2021 मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले

2 डिसेंबर 2020 रोजी रिलायन्स इन्फ्राची शेअर किंमत 22.85 रुपये होती, जी 7 जून 2021 रोजी 73.25 रुपयांवर पोचली. या काळात या शेअरमध्ये 220 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, एका वर्षात याची शेअर प्राइझ 265 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे, तर 2021 च्या सुरूवातीपासूनच स्टॉकमध्ये 160 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मार्चमधील रिलायन्स इन्फ्राचा तोटा 46.53 कोटी रुपयांवर आला आहे. यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 153.48 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यानंतर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात त्यांचे उत्पन्न 4,610.72  कोटी रुपयांवर गेले आहे. जी गेल्या वर्षी याच म्हणजेच जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात 4,012.87 कोटी रुपये होते.

Read More