नवी दिल्ली : सोशल मीडियावत रोज एक नवा फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतो. त्यामधील काही गोष्टी फार कमी काळासाठी चर्चेत असतात. पण काही गोष्टी अशा असतात ज्या चर्चेत कायम राहतात. त्यामधील एक 'लखनऊ गर्ल' प्रियदर्शनीचे व्हिडिओ. गेल्या काही दिवसांपासून प्रियदर्शनीने एका ड्रायव्हरला मारहाण केली. यामुळे प्रियदर्शनी मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. असं असताना प्रियदर्शनीचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे.
प्रियदर्शिनी नारायण यादव या व्हिडिओमध्ये पोलिसांना विनंती करताना दिसत असून ती शेजाऱ्यांना त्याच्या घराची भिंत पुन्हा रंगवण्याचा आदेश द्या... असं म्हणताना दिसत आहे. कारण काळा "आंतरराष्ट्रीय ड्रोन" या ठिकाणी हल्ला करू शकतो जे शेजारी राहणाऱ्या लोकांच्या जीवनासाठी धोकादायक आहे. आता व्हायरल होत असेलेला प्रियदर्शनीचा व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा आहे.
This is the 2 Year Old Video Of #PriyadarshiniYadav
— DeshKHeet (@DesKHeet) August 5, 2021
Arguing with Neighbours over the Black Colour of their Main Gate.
Credits: ig@be_harami#ArrestLucknowGirl #PriyadarshiniNarayan pic.twitter.com/KMB5eR6IW0
दरम्यान, कॅब ड्रायव्हरला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रियदर्शनीच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. आता तिचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील प्रियदर्शनी नारायणवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे मोठे प्रयत्न सुरू झाले आहेत.
पोलिसांनी प्रियदर्शनीची चौकशी केल्यानंतर चार्जशीट तयार केली आहे. पण प्रियदर्शनी सांगते की तिला आता सामंजस्याने प्रकरण मिटवायचे आहे. या प्रकरणी 'झी मीडिया'सोबत झालेल्या संवादात प्रियदर्शनी म्हणाली की माझ्यामुळे कोणाचं करियर खराब होईल असं मला वाटत नाही. शिवाय माझं करीयर खराब होईल असं देखील मला वाटत नाही. हे प्रकरण सामंजस्याने मिटवं असं प्रियदर्शनीची इच्छा आहे.