Aditya-L1 : भारताच्या Aditya-L1 यानाने आपल्या मोहिमेतील अत्यंत महत्वाचा यशस्वी टप्पा गाठला आहे. ग्रहांची शक्ती मोजणारे यंत्र अर्थात Magnetometer Boom स्थापित करण्यात ISRO च्या संशोधकांना यश आले आहे. या Magnetometer Boom च्या मदतीने सर्यासह सर्व ग्रहांच्या चुंबकीय शक्तीचे मोजमाप करणे शक्य होणार आहे. यामुळे Aditya-L1 यशस्वी होण्यासाठी Magnetometer Boom कडून मिळणारा डेटा मोहिमेसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
2 सप्टेंबर 2023 रोजी भारताचे Aditya-L1 हे यान सूर्याच्या दिशेने झेपावले. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य L1 यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. पृथ्वीपासून जवळपास 5 लाख किलोमीटरचा पल्ला आदित्य L1 नं यशस्वीरित्या पूर्ण केला. 6 जानेवारी 2024 रोजी आदित्य L 1 सूर्याजवळच्या लॅग्रेंज पॉईंटवर पोहोचलंय. सूर्याच्या हॅलो ऑर्बिटमध्ये आदित्य 1 प्रस्थापित झालं. सूर्याच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर आदित्य L1 मोहिम खऱ्या अर्थाने सुरु झाली.
आदित्य-L1 मध्ये बसवलेले 6 मीटर लांबीचे मॅग्नेटोमीटर बूम यशस्वीरित्या तैनात आणि सक्रिय करण्यात आले आहेत. आदित्य सोलर प्रोब 11 जानेवारी 2024 रोजी L-1 पॉइंटवर तैनात करण्यात आले. आदित्य-L1 चा मॅग्नेटोमीटर 132 दिवस बंद ठेवण्यात आला होता. Magnetometer Boom च्या आत दोन अत्याधुनिक, अत्यंत अचूक फ्लक्सगेट मॅग्नेटोमीटर सेन्सर आहेत. या सेन्सरच्या मदतीने अंतराळातील ग्रहांमधील चुंबकीय शक्ती आणि त्याचे फील्ड शोधते शक्य होणार आहे. हे सेन्सर यानापासून 3 मीटर आणि 6 मीटर अंतरावर तैनात करण्यात आले आहेत. Aditya-L1 यातून निघणाऱ्या शक्तीचा यावर परिणमा होऊ नये यासाठी काही अंतरावर हे सेन्सर तैनात करण्यात आले आहेत.
या दोन्ही सेन्सरच्या मदतीने ग्रहांच्या चुंबकीय शक्तीबाबत अचूक डेटा मिळणार आहे. हे मॅग्नेटोमीटर बूम कार्बन फायबर प्रबलित पॉलिमरपासून बनले आहेत. हे दोन मॅग्नेटोमीटर्स तैनात करण्यासाठी 9 सेकंद लागले. दे दोन्ही मॅग्नेटोमीटर्स स्क्रिय झाले आहेत. लवकरच ते डेटा गोळा करुन पाठवतील. हा डेटा पुढील मोहिमेसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.
Aditya-L1 Mission:
— ISRO (@isro) January 25, 2024
The 6m magnetometer boom, previously stowed for 132 days, is now successfully deployed in the Halo orbit.
The boom houses two fluxgate magnetometers that measure the interplanetary magnetic field in space.
Details: https://t.co/ZrSKAVu1z4 pic.twitter.com/Xq4LmwBhwE
भारताच्या आदित्य एल1 या सूर्ययानाबरोबर 7 वेगवेगळे पेलोड्स अवकाशात झेपावले आहेत. हे पेलोड सूर्याचा विविध बिंदूंवर अभ्यास करतील. संशोधनातून मिळालेला डेटा आणि सूर्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती या पेलोडच्या माध्यमातून मिळणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे.