Marathi News> भारत
Advertisement

अनुराग ठाकूर भरसभेत ढसाढसा रडले, केंद्रीय मंत्र्यांना अचानक काय झालं?

Anurag Thakur : हिमाचल प्रदेशच्या सुजानपूर विधानसभेत एका निवडणूक सभेत अनुराग ठाकूर खूपच भावूक झाल्याचं पहायला मिळालं. 

अनुराग ठाकूर भरसभेत ढसाढसा रडले, केंद्रीय मंत्र्यांना अचानक काय झालं?

Anurag Thakur Emotional : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हिमाचल प्रदेशच्या सुजानपूर विधानसभेत एका निवडणूक सभेत ते भावूक झाले. सुजानपूर चौगान येथे भाजपचे उमेदवार कॅप्टन रणजित सिंह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जाहीर सभेत ते बोलत होते.

काय म्हणाले Anurag Thakur - 

माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी भाजप कार्यकर्ते आणि संघटन मजबूत करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एका धाग्यात बांधून संघटना मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. हे सांगताना अनुराग ठाकूर यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. 

आणखी वाचा - राज ठाकरेंचा Swag च वेगळा, एकच मारला पण सॉलिड मारला, शिंदे-फडणवीस खळखळून हसले!

मला तुमच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात. पक्षाच्या युवा आघाडीपासून ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत तुम्ही ज्या भावनेने काम केलं ते खूप वेगळं आहे. ही एक कौटुंबिक भावना आहे. हे फार कमी ठिकाणी बघायला मिळेल, असं म्हणताना ठाकूर अतिशय भावूक झाले.

पाहा व्हिडीओ - 

आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आमचा जन्म याच जिल्ह्यात झाला, आम्हालाही अशाच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. जिथे तुमच्यासारखे कामगार आहेत. तू मला एकदा नाही तर चार वेळा अशी संधी दिली आहेस. तुम्ही धुमाळ यांना मुख्यमंत्री केले, असं म्हणत अनुराग ठाकूर यांनी डोळे पुसले.

Read More