Marathi News> भारत
Advertisement

जमावाच्या दगडफेकीत जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू

दगड लागताच सिंह यांच्यावर प्रथमोपचार करून रुग्णालयात दाखल करण्यात आलं

जमावाच्या दगडफेकीत जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू

श्रीनगर : जमावाने केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू झालाय. शिपाई राजेंद्र सिंह असं या जवानाचे नाव आहे... ते गुरूवारी सीमा रस्ते दलाला सुरक्षा पुरवणाऱ्या शीघ्रकृती पथकात होते. गुरूवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा राष्ट्रीय महामार्ग ४४ जवळ अनंतनाग बायपास जंक्शन जवळून जात असताना काही तरूणांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने दगडफेक केली. त्यात राजेंद्र सिंह जखमी झाले. एक दगड थेट त्यांच्या डोक्यात लागला अशी माहिती लष्करी अधिकाऱ्याने दिली, 

दगड लागताच सिंह यांच्यावर तात्काळ प्रथमोपचार करून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 

'राजेंद्र सिंह गुरुवारी सीमा रस्ते संघटनेच्या एका गटाला सुरक्षा प्रदान करणाऱ्या क्युआरटी दलात सामील होते. सायंकाळी ६ वाजल्याच्या सुमारास हा ताफा एनएच ३३ जवळून अनंतनाग बायपास तिराहेपासून जात असताना काही तरुणांनी गाडीवर दगडफेक केली... त्यातील एक दगड थेट राजेंद्र यांच्या डोक्यावर लागला' अशी सेनेच्या एका अधिकाऱ्यानं माहिती दिली.

राजेंद्र हे उत्तराखंडमधील बडेना गावचे रहिवासी आहेत. ते २०१६ मध्ये सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या मागे कुटुंबात त्यांचे आई-वडील आहेत. 

Read More