Marathi News> भारत
Advertisement

अरुण जेटलींना किडनीचा त्रास, सुरू आहेत उपचार

अर्थमंत्री अरुण जेटली यांची तब्बेत बिघडल्याची चर्चा होत आहे.

अरुण जेटलींना किडनीचा त्रास, सुरू आहेत उपचार

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांची तब्बेत बिघडल्याची चर्चा होत आहे.

त्यांना किडनीशी संबंधित त्रास असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल केलं नाहीए. पण इन्फेक्शनपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांना देण्यात आलाय. यासाठी घरातून बाहेर न पडण्यास डॉक्टरांनी सांगितलयं. यासंदर्भातील माहीती स्वत: अरुण जेटली यांनी दिली आहे. मला किडनीशी संबंधत त्रास असून यावर इलाज सुरू आहे. मी आजकाल घरातूनच कामकाज करतो. पुढच्या इलाजासाठी डॉक्टरांशी सल्ला सुरू असल्याचे अरुण जेटली यांनी सांगितले.  

Read More