Marathi News> भारत
Advertisement

मुस्लिमांना 'पाकिस्तानी' म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाका - ओवैसी

ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारकडे एक नवा कायदा करण्याची मागणी केलीय. 

मुस्लिमांना 'पाकिस्तानी' म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाका - ओवैसी

नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारकडे एक नवा कायदा करण्याची मागणी केलीय. 

भारतीय मुसलमानांना 'पाकिस्तानी' म्हणणाऱ्यांना तीन वर्ष तुरुंगाची शिक्षा देण्याचा कायदा करण्यात यावा, अशी मागणी ओवैसी यांनी लोकसभेत केलीय. 

यासोबतच, भाजप सरकार आपली ही मागणी कधीही पूर्ण करणार नाही असा मला विश्वास आहे... आणि यापद्धतीचं विधेयक कधीही अस्तित्वात येणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. 

तसंच, तीन तलाकविरुद्ध संसदेत आणण्यात आलेलं विधेयक 'महिला विरोधी' आहे असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. हे विधेयक सामाजिक समस्येचं समाधान नाही, हे केवळ मुस्लिम पुरुषांना तुरुंगात टाकण्याचा कट आहे, असं बेताल वक्तव्यही त्यांनी केलं. 

Read More